*शिंदखेडा शहरात बिजासनी मंगल कार्यालयात कृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वावर सांस्कृतिक कार्यक्रम अद्वितीय नुत्ये सादर*
शिंदखेडा दि.०२(प्रतिनिधी तालुका यादवराव सावंत) शिंदखेडा येथे जन्माष्टमीचा अद्वितीय उत्सव आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांची स्टेज धाडसी वाढवणं असा होता. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची प्रतिभा ओळखून त्यांना पुढे घेऊन जायचे काम कार्यक्रमाचे आयोजक खुशी कोचिंग क्लासचे संचालक. मयुरेश अग्रवाल सर, सौ. वर्षा अग्रवाल मॅडम , नंदिनी मॅडम आणि कृष्णकला डान्स अकॅडमी चे संचालक सागर वाघ यांनी केले. येथे सुनिल सेंदाणे (तहसीलदार, शिंदखेडा), मा.श्री. सुनिल भाबड (पोलिस निरीक्षक), रावसाहेब अनिल वानखेडे (गटनेते व नगरसेवक नगरपंचायत शिंदखेडा). पंकज अशोक भामरे (सहाय्यक अभियंता). गिरिष बागुल, समस्त पालक वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमात रावसाहेब अनिलजी वानखेडे यांचे अनमोल सहकार्य लाभले.हयावेळी हर्षदा चौधरी, कादंबरी देसाई,गार्गी सुर्यवंशी,कांचन पवार यांनी सादर केलेल्या नुत्यास दाद मिळाली. या क्लासेस शहरात विद्यार्थ्यांना सर्व सुविधा आणि मंच उपलब्ध करून देण्यासाठी धडपडत असतात म्हणून यांचे शिंदखेडा वासियां तर्फे कौतुक करण्यात येत आहे