*शिंदखेडा येथे रोटरी क्लब च्या वतीने गणरायाच्या शाळुमाती पासून मुर्ती तयार करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन* शिंदखेडा दि. ०२(तालुका प्रतिनिधी ) येथील बिजासनी मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या रोटरी क्लबच्या वतीने गणपती बाप्पा ची शाळुमाती पासुन मुर्ती कशी तयार करण्याविषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यशाळेला धुळे येथील कमलाबाई शाळेचे कलाशिक्षक केदार नाईक यांनी मार्गदर्शन केले.जवळपास 150 मुला मुलीनी सहभाग नोंदवून लाभ घेऊन आनंद लुटला व आपल्या कलाकौशल्य सादर केले. सदर कार्यशाळेचे प्रास्तविक रोटरी क्लब चे सचिव संदिप सोनार यांनी केले.हयाप्रसंगी अध्यक्ष प्रा.गोपालसिह परमार ,चेअरमन देवेंद्र नाईक ,सचिव संदिप सोनार , संजयकुमार महाजन ,हर्षल अहिरराव ,महेंद्र पाटील , सुजय पवार ,सुधीर शिंपी , लखन सोनवणे , सुमीत जैन , सूदीप गिरासे .हितेंद्र जैन , विनोद जैन , विक्की चंदनानी .डॉक्टर विनय पवार , केदार फुलंबीकर यांनी सहकार्य केले .हयावेळी उक्तृष्ट तीन गणपती मुर्ती सजावट साठी प्रथम पुर्वा वसंत सोनवणे द्वितीय क्रिष्णा चंद्रकांत महाले तृतीय निकिता जगदीश पाटील यास शैक्षणिक साहित्य देवून मान्यवराच्या हस्ते गौरविण्यात आले.सदर कार्यशाळेला मिरा नोटबुक ब्रजेश शहा यांचे योगदान लाभले.