उद्या शिक्षकदिनी चोपडा तालुक्यातील विष्णापुर शासकीय आदिवासी आश्रमशाळा इमारतीचे बांधकाम* *भुमिपुजन सोहळा "".. पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार भूमिपूजन.. आमदार* *निधीतून १४ कोटींचा निधी मंजूर.."आमदार सोनेवणे दाम्पत्याचा" भर पावसाळ्यात विकास कामांचा महापुर.. जनतेच्या डोळ्यात अंजन घालणारे भरीव कामे.. चोपड्याच्या इतिहासात पहिल्यांदाच..* कार्यक्रमाची जय्यत तयारी
चोपडा दि.०२(प्रतिनिधी): मा.आ.सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे (आमदार चोपडा विधानसभा) यांचे प्रयत्नातुन मंजूर झालेले विष्णापुर ता.चोपडा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळा इमारतीचे बांधकाम भुमिपुजन सोहळा दि.०५ सप्टेंबर २०२१, रविवार रोजी स. ११.०० वा.विष्णापुर येथे ना. भाऊसो. गुलाबरावजी पाटील (पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगांव जिल्हा पालकमंत्री) यांच्या शुभहस्ते तर
मा. सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे (आमदार, चोपडा विधानसभा) व मा. आण्णासोा. प्रा. श्री. चंद्रकांत बळीराम सोनवणे (माजी आमदार, चोपड़ा विधानसभा तथा सहसंपर्क प्रमुख रावेर लोकसभा) यांच्या प्रमुख अतिथी उपस्थितीत होत आहे
ह्या कामाचीअंदाजित किंमत : रुपये १४.०० कोटी (चौदा कोटी रु.) आहे तरी सर्व शिवसेना पदाधिकारी, गटप्रमुख, कार्यकर्ते, नगरसेवक,बुथ प्रमुख ,आजी-माजी,जि.प.सदस्य, पं.स.सदस्य,आणि नवनियुक्त सर्व कमेटी सदस्य व शिवसैनिक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे