शिंदखेडा नगरपंचायतीचे भाजपा गटनेते मा.रावसाहेब अनिल वानखेडे यांनी केली केटिवेअरची पाहणी ..केटीवेअर भरण्यासाठी सातत्याने पाठपुरावा - शहरातील नागरिकांना दिलासा.*

 



*शिंदखेडा   नगरपंचायतीचे  भाजपा गटनेते मा.रावसाहेब अनिल वानखेडे यांनी केली केटिवेअरची पाहणी ..केटीवेअर भरण्यासाठी सातत्याने पाठपुरावा - शहरातील नागरिकांना दिलासा.*    

शिंदखेडा दि.१० तालुका प्रतिनिधी ( यादवराव सावंत )                   शिंदखेडा शहरातील मुख्य पाणीपुरवठा करणाऱ्या आधार असलेल्या केटिवेअरला तब्बल पावसाळ्याचे तीन महिने उलटले तरी बुराई नदीवरील केटिवेअरला पाणी आले नव्हते.गेल्या चार पाच दिवसापासून शहरात मध्यम स्वरूपाचा तर साक्री तालुक्यातील दुसाणे कार्यक्षेत्रातुन वाहुन येणाऱ्या बुराई नदी ला त्या भागात मुसळधार पावसामुळे नदी वाहु लागली आहे.हया नदीवर ठिकठिकाणी जवळपास चौतीस लहान मोठे बंधारे आमदार व माजी मंत्री जयकुमार रावल यांच्या पायी परिक्रमा चोपण किमीचे नियोजन केले.व बुराई नदी बारमाही करण्यासाठी कष्ट करून त्यास गावागावातुन तेवढ्याच प्रमाणात प्रतिसाद मिळाला.परंतु निसर्गाने पाहिजे तशी साथ दिली नसली तरी मागील चार पाच दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे नदीला नवसंजीवनी मिळाली आहे.त्यामुळेच 

.09/09/2021 रोजी शिंदखेडा शहराची जलवाहिनी *बुराई नदी* ला पाणी आलेले आहे,पाण्याचा साठा कारण्यासंदर्भात केटीवेअर ची पाहणी करतांना रावसाहेब अनिल वानखेडे यांचा सोबत भाजपा शहर अध्यक्ष प्रविण माळी, नाना माळी, धर्मेंद्र राऊळ, भैय्यादादा शेख उपस्थित होते .मोठ्या प्रमाणावर नदीच्या केटिवेअरला जलसाठा झाला तर शहराचा पुढील काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.त्यासाठी नगरपंचायत गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे हे सातत्याने पाहणी करून केटीवेअर भरण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने