_*..आता आमची सटकली..!सावळदेकरांमध्ये प्रचंड क्रोध..!!*_
आपली तपश्चर्या पूर्ण झाली असेल तर जागे व्हा.. महामार्गावर गंगा जमुनेने रूद्र रूप धारण केले आहे की काय अशी स्थिती..! वर्ष उलटूनही ड्रेनेजचा प्रश्न सुटत नसेल .. तर कागदी घोड्यांना न जुमानण्याच्या आविर्भावात राहू नका.. गावकऱ्यांचा निर्वाणीचा इशारा.. साहेब आहात साहेबच राहा..अशीही केली विनंती..!*
शिंदखेडा दि.१०(प्रतिनिधी रवि शिरसाठ) : सावळदे ग्रामपंचायत हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 ला ड्रेनेजसाठी एका वर्षापासून निवेदन देऊनही महामार्ग अधिकारी कुंभकर्णी झोपेत आहेत . वास्तविक पाहता या हद्दीत टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात वसुली सुरू असल्यावरही नामांकित कंपनीची जोरात तेजी सुरू आहे.. रस्त्यावर मात्र पुराचे पाणी शहरांत घुसल्याची भितीच वाहन चालकाचे अंगात थरकाप उडाल्यासारखी भरते आहे.. शिरपूर शहर सुंदर रस्त्यांसाठी ख्याती असले तरी वाहनधारकांची मात्र फटफजिती होतं आहे.एसीची हवा खात बसणाऱ्यांनो नुसत्या हवेत डुलक्या घेत बसू नका.. महामार्गावर पूर्ण पणे गंगा जमुनेने रूद्र रूप धारण केले की काय? असं चित्र थोडाश्या पावसाने होते आहे मग पुढची अवस्था काय होईल याचा विचार करा ..कागदी घोडे कितीही नाचू द्या..काहीही होत नाही या आविर्भावात राहू नका..गाव करील तिथं राव करील हा विचार गावकऱ्यांच्या डोक्यात भणभणू लागलायं यांचा विचार करा.. साहेब..आहात ..साहेबच राहा.. आम्हाला साहेबच बोलणें. खूप आवडतयं..सायब्या म्हणण्याची वेळ आमच्यावर आणू नका अशी विनंती गावकऱ्यांनी केली आहे . वर्षं होऊनही आपण समाधीस्त आहात काय? आमच्या अडचणी ची दखल घ्या ..आम्हाला रस्त्यावर उतरण्यास भाग पाडू नका असा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 हा सावळदे ग्रामपंचायतीच्या हद्दीतुन जातो..तसेच सावळदे ग्रामपंचायतीच्या हद्दीतुनच शिंदखेडा जाण्यासाठी चौफली आहे..आणि त्या चौफुलीला लागुनच सर्विस रोड आहे....
हायवे व सर्विस रोडला लागुन सावळदे ग्रामपंचायतीच्या नविन वसाहत आहे..
पावसाळ्याचे पाणी हे ह्याच चौफुलीजवळ गोळा होऊन हायवेवर एक डबकारुपी तलावासारखी परिस्थिती निर्माण होते.व ह्याच डबक्यातुन नविन वसाहतील नागरिकांना तारेवरची कसरत करुन मार्गक्रमण करावे लागते.तसेच सध्या सर्वत्र साथीच्या रोगाने थैमान घातले आहे. ह्या डबक्यारुपी तलावामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते..राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 चे जबाबदार अधिकारींना सावळदे ग्रामपंचायतीने 25/8/2020ला निवेदन देऊनही अधिकारी डोळेझाकुन लोकांच्या जिवाशी खेळत आहे.
जर का अधिकारी असेच मनमानी करत असतील तर परिसरातील नागरिक चक्काजाम आंदोलन करतील असा ईशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे...