*तांदलवाडी येथे भूमीसुपोषण व संरक्षण राष्ट्रीय अभियान अंतर्गत भूमिपूजन उत्सव संपन्न*
चोपडा दि.०३(प्रतिनिधी)
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील तांदलवाडी येथे *भूमीसुपोषण व संरक्षण राष्ट्रीय अभियान अंतर्गत भूमिपूजन उत्सव* *दिनांक २ सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:३० वाजता* मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
गावातील चांगदेव मंदिरात पार पडलेल्या या कार्यक्रमाची तयारी गावकऱ्यांनी एक दिवस अगोदरपासूनच सुरू केली होती.
उत्सवाच्या दिवशी सकाळी मंदिरासमोर *शेणाचा सडा सारवण करून रांगोळीने मंदिर प्रांगण सुशोभित* केले होते.
गावातील विविध शेतकऱ्यांच्या *शेतातून आणलेली माती एका स्वच्छ कापडावर अंथरून त्यावर तांब्याचा कलश* ठेवला होता.
कलशाला पानाफुलांनी व रांगोळीने सुशोभित केले होते.
गावातील *५ जोडपी पूजेसाठी* बसली होती व अन्य मंडळी ४६ पुरुष आणि १७ महिला उत्साहात तयार होऊन उपस्थित होते.
*दीपक धनगर यांच्या सोबत मंत्रोच्चाराने उपस्थित जोडप्यांनी *माती व कलशाला जलाभिषेक* केला.
शंख नादाने पूजा प्रारंभ झाली , पूजा संपन्न झाल्यावर श्री.विशाल पाटील यांनी *भूमीसुपोषण व संरक्षण राष्ट्रीय अभियानाची संकल्पना* मांडली व *भूमीसुपोषणाची आवश्यकता* विषद केली.
त्यानंतर उत्सवाला *वक्ते म्हणून लाभलेले श्री.विनय कानडे (ग्रामविकास देवगिरी आणि पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचारक)*
यांनी *भूमीसुपोषणाच्या दृष्टीने सेंद्रिय शेतीचे महत्व* या विषयावर उपस्थितांना उद्बोधित केले.
उपस्थित *सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुभव कथन यात श्री.अशोक पाटील यांनी केळीच्या साली पोटॅश निर्मिती करून केळी च्या उत्तम उत्पादन मिळणेकडे वाटचाल केली आहे तसेच श्री. विजय जाधव (कठोरा) यांनी आपल्या शेतातील नैसर्गिक केळी उत्पादनचे अनुभव सांगितले* व *सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा* यांविषयी चर्चा झाली.
उत्सवाला गावचे उपसरपंच मा.श्री प्रवीण धनगर पूर्णवेळ उपस्थित होते.
शेवटी सर्वांनी भूमीसुपोषणाचा संकल्प केला व भारत माता की जय जयघोष ने समारोप झाला नंतर गोमाता पूजन करून,उपस्थित शेतकऱ्यांनी *आपापल्या शेतात टाकण्यासाठी पूजनासाठी आणलेली थोडी थोडी माती सोबत* घेतली.
हा भूमिपूजन उत्सव यशस्वी करण्यासाठी *ग्रामविकास समिती व गावकऱ्यांनी* परिश्रम घेतले.