_*वाढोणा बाजार येथील विजेच्या लपंडावामुळे गावकरी त्रस्त*_* गावातील विद्युत महावीतरणाचे कार्यालय बनले शोपिस..गेल्या दोन ते तीन महिन्यापासून हा प्रकार सुरू.. महावितरनाचे कर्मचारी झोपेत ....
वार्ताहर वाढोणा बाजार (आशिष मडकाम)
----------------------------------------
राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथील गेल्या दोन ते तीन महिन्यापासून लाईन ही दिवसातून शंभर वेला जाण्या येण्याचा प्रकार घडुन येत आहे ही लाईन बरडगाव (राळेगाव) या 132 kv विद्युत केंद्रावरून जोडलेली असून सुद्धा हा प्रकार घडुन येत आहे या लाईनच्या येण्याजाण्या मुळे गावातील नागरिक त्रस्त झाले आहे तरी सुद्धा विद्युत महावितरण कंपनीचे दुर्लक्ष याकडे होत आहे या विद्युत केंद्राला गावात सुरू होऊन एक वर्ष पूर्ण होत आहे तरी सुद्धा यांचा फायदा होतांना दिसत नाही. या वीजपुरवठा कंपनीला एकंदरीत बारा ते तेरा गावे जोडीला आहे. यात करंजी सो. रानवड,वाठोडा,आठमुरडी, वेडशी, चिखली, पिंपळगाव, भुलगड,धानोरा, रोहिणी, दापोरीअसे एकूण बारा ते तेरा गावे या केंद्राला जोडली असून त्यांना सुद्धा हा त्रास सहन करावा लागत आहे या असल्या प्रकारामुळे गावातील उपसरपंच योगेश पुंडलिक देवतळे यांनी संबंधित अधिकारी यांना महावितरण विभागाच्या लंपनडावाचे निवेदन दिले असून त्यांनी त्याच्या निवेदनातून या समसेचा तोडगा काढावा अशी मागणी विद्युत अधिकारी यांना केली आहे.

