शिंदखेडा तालुक्यातील तामथरे येथे भिल संघर्ष गृपच्या वतीने आदिवासी अधिकार दिवस साजरा*

 






*शिंदखेडा तालुक्यातील तामथरे येथे भिल संघर्ष गृपच्या वतीने आदिवासी अधिकार दिवस साजरा*    

शिंदखेडा तालुका प्रतिनिधी ( यादवराव सावंत )                      शिंदखेडा तालुक्यातील तामथरे येथे आदिवासी अधिकार दिवस साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच योगेंद्र गिरासे होते.प्रमुख पाहुणे म्हणून धनेश ठाकरे ,पंचायत समिती सदस्य दिपक मोरे ,युवाध्यक्ष प्रेमकुमार सोनवणे ,विनोद सोनवणे उपसरपंच निशाणे ,देवा भिल सरपंच मुकटी ,भाऊसाहेब ठाकरे माजी सरपंच तामथरे, नानाभाऊ ठाकरे ,ज्ञानेश्वर अहिरे ,सुरेश सोनवणे ,भावसिंग सोनवणे ,रोशन ढिवरे ,संजीव चौधरी, मनोहर चौधरी , काशिनाथ चौधरी ,शंकर चौधरी ,दादा माळी , रवींद्र गिरासे आदी उपस्थित होते.हयावेळी आदिवासी अधिकार दिनाच्या निमित्ताने समाजात मुलभूत अधिकार विषयी सखोल माहिती देत समाजातील अशिक्षित पणा बाजूला ठेवून मागची पिढी शिक्षणापासुन वंचित ठेवले गेले.तसे न करता आताच्या तरुण पिढीला आपल्या लहान मुलांना शिक्षणापासुन वंचित न ठेवता शिक्षीत करावे तसेच व्यसनापासुन दुर ठेवावे असे भिल संघर्ष गृपचे भाऊसाहेब मालचे यांनी सांगितले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भिल संघर्ष गृपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला समाजातील महिला , तरुण समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने