शिंदखेडा येथे आदिवासी एकता परिषद च्यावतीने आदिवासी अधिकार दिवस साजरा*




 




*शिंदखेडा येथे आदिवासी एकता परिषद च्यावतीने आदिवासी अधिकार दिवस साजरा*                                

  शिंदखेडा दि.१३ ( प्रतिनिधी ) येथील आदिवासी एकता परिषद  शिंदखेडा वतीने आयोजित बंगला भिलाटी येथील संपर्क कार्यालयात आदिवासी अधिकार दिवस साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे येथील अँड.राजेंद्र वाघ तर प्रमुख पाहुणे म्हणून शिंदखेडा पोलिस स्टेशनचे पी.एस.आय.गजानन गोटे उपस्थित होते.सुरुवातीला क्रांतीवीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर अधिकार दिवसाचे महत्त्व पटवून देताना पी.एस.आय.गजानन गोटे यांनी सांगितले की, आदिवासी समाजात संविथानिक , मुलभूत कायद्याची कुणीही अवहेलना करू शकत नाही.तसे झाल्यास आपणास न्यायालयात धाव घेऊन न्याय मागता येतो.प्रथम समाजात अधिकार विषयी असणे आवश्यक आहे.त्याशिवाय शिक्षणासाठी समाजात जागृती निर्माण करणे व व्यसनापासून तरुण पिढी ला दुर ठेवावे.त्यानंतर अँड.राजेंद्र वाघ यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले.तालुक्यातील शाखाप्रमुखामध्ये पं.स.सदस्य रवि चव्हाण, तालुका सचिव गुलाब सोनवणे, उपसचिव भुपेंद्र देवरे,कार्याध्यक्ष बापुजी फुले,मा.सरपंच भाऊसाहेब मालचे यांनी मनोगत व्यक्त केले.हयाप्रंसगी तालुका सचिव गुलाब सोनवणे, उपसचिव भुपेंद्र देवरे, कार्याध्यक्ष बापुजी फुले, सल्लागार आप्पा सोनवणे,शामभाऊ सोनवणे, संपर्क प्रमुख सुरेश मालचे सह तालुक्यातील आदिवासी एकता परिषद चे शाखाप्रमुख संजय ठाकरे,शाम ठाकरे ( धमाणे) रणजित बागुल,मधु सोनवणे (चावळदे) पंकज फुले,दिलीप बागुल ( परसासळ) गणेश मोरे(अमळथे) राजु मोरे,भुरमल ठाकरे (सतारे) भैय्या मोरे,ज्ञानेश्वर मोरे,लखन मोरे (दलवाडे) योगेश सोनवणे, सुकदेव अहिरे,सागर निकुंभ ( वरुळ घुसरे) यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.सुत्रसंचलन ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश सोनवणे यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने