*आज चोपडा येथील पत्रकार बांधवांना मतदार संघाचे धडाकेबाज माजी आमदार चंद्रकांत अण्णासाहेब सोनवणे यांच्या शुभहस्ते मेडिसीन किटचे वाटप*




 



*आज चोपडा येथील पत्रकार बांधवांना मतदार संघाचे धडाकेबाज माजी आमदार चंद्रकांत अण्णासाहेब सोनवणे यांच्या शुभहस्ते मेडिसीन किटचे वाटप* 

चोपडा दि.१३(प्रतिनिधी)

      जळगाव जिल्हयातील पत्रकारांनी कोरोनाच्या काळात सतत बाहेर राहून आपल्या कर्तव्याशी दोन हात करीत आपले कार्य बजावत राहतात. जेणे करून जनते पर्यंत दिवस भरातील ताज्या घडामोडीच्या  बातम्या पोहचवणे हाच ध्यास मनाशी बाळगून बातम्या घराघरापर्यंत पोहचवतात. काही वेळा अवघड व कठीण प्रसंगातून  बातमी घेण्यासाठी जावे  लागते. हे काम करीत असतांना ह्या ना त्या समस्यांचा सामना करावा लागतो. हे सर्वांचा विचार करीत मा. मुख्यमंत्री श्री उध्दवजी ठाकरे  यांच्या दुरदृष्टी कोनातून सर्व पत्रकारांचा विचार करीत त्यांना जिवाची तमा न बाळगता सतत वेळीअवेळी आपले कार्य करणा-या पत्रकार बांधवांना सुरक्षाच्या दृष्टीने यांच्या आश्रयाने व डॉ.श्रीकांत शिंदे फाऊण्डेशन च्या वतीने    शिवसेना नेते तथा राज्याचे नगरविकास  मंत्री तथा सा.बां.मंत्री ,  मा. ना. श्री एकनाथजी शिंदे साहेब व   मा. खा. डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या सौजन्याने  मेडिसीन किटचे वाटप चोपडा मतदार संघाचे माजी आमदार चन्द्रकांतजी आण्णा सोनवणे यांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले.

चोपडा मतदार संघाचे धडाकेबाज माजी आमदार चंद्रकांत सोनवणे  यांच्या शुभहस्ते चोपडा तालुक्यातील पत्रकारांना बांधवांना  मेडिकल किट वाटप  करण्याचा प्रथमच कार्यक्रम घेण्यात आला.कोरोना सारख्या महासाथीच्या काळात अहोरात्र जोखीम उठविणाऱ्या पत्रकार बांधवांच्या प्रथमच दखल घेतल्याबद्दल सर्वांतर्फे अण्णासाहेबांचे आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी   संजीव सोनवणे, अनिलकुमार पालीवाल, पंकज पाटील, प्रवीण पाटील,शाम जाधव,लतिष जैन,उमेश नगराळे, महेश शिरसाठ,सचिन जयस्वाल, कैलास बाविस्कर, नंदलाल मराठे, रविंद्र पाटील,हेमकांत गायकवाड,विलास पाटील, डॉ.सतिष  भदाने, महेश पाटील,छोटू वारडे , विश्वास वाडे आदी  पत्रकार बांधवांना प्रथम उपचार पेटीचे वितरण करण्यात आले.

याप्रसंगी हरीषभाऊ पाटील जि.पसदस्य ,एम व्ही पाटील पं.स.सदस्य ,गंभीर सर राजुभाऊ पाटील ता.प्रमुख ,न.पा.नगरसेवक किशोरभाऊ चौधरी, नगरसेवक प्रकाशभाऊ राजपुत ,विकासभाऊ पाटील, नितीन पाटील ,नरेद्र बाविस्कर, धिरज गुजराथी, प्रतिभा माळी, प्रवीणभाई जैन, गणेशपाटील, नामदेव पाटील ,पिताराम पावरा, नानेश्वर अहीरे संरपच हातेड खु., सुरेश दादा पाटील वढोदा, सोमनाथ पाटील आडगांव ,संदीप धनगर अकुलखेडा, प्रेमचंद पाटील, सुनिल पाटील,दीपक बिऱ्हाडे जगदीश मराठे दिपकभाऊ चौधरी अनिल बाविस्कर दिव्यांक सांवत छोटुभाऊ वडगाव,राजेद्र पाटील सर आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने