चौगावच्या गुणवंतने केले हरीयानावर राज..

 



*चौगावच्या गुणवंतने केले हरीयानावर राज..

चौगाव,ता.चोपडा  दि.२०(प्रतिनिधी) राष्ट्रीय  स्पर्धेत हरियाणा रोहतक येथे "स्टूडेंट ऑलिंपिक असोसिएशन नॅशनल चॅम्पयनशिप 2021" या athletic स्पर्धेत जळगाव जिल्हयातील लहानशा 'चौगाव ' या गावातील रहिवासी ' गुणवंत विठ्ठल पाटील ' या तरुणाचे राष्ट्रीय पातळीवर Athletics (रनिंग 200m ) स्पर्धामध्ये ब्रांझ पुरस्कार   मिळवून त्याने गावाचे नाव मोठे केले आहे . याच बरोबर आपल्या आई वडीलाचे नाव गौरवित करून उंचावले आहे .

                  हरियाणा मधील कुस्तीगीर शहर म्हणून ओळखले जाणारे असे रोहतक या शहराची ओळख सांगावी अशी काही ही गरज नाही कारण स्वतःची प्रसिद्धी असलेले नाव आहे  कुस्तीगीर शहर रोहतक .येथील आयोजित स्पर्धेत शासकीय शाळेच्या मैदानावर 200m रनिंग लढीतीमध्ये 17 वर्ष वयोगटतील अथलिट  'गुणवंत पाटील' हा महाराष्ट्र कडून खेळत असताना त्याने पहिल्या 100m मध्ये स्पीड न घेतल्यामुळे नंतर शेवटच्या 100m मध्ये स्पीड रिकव्हर करून ' तिसरे '  स्थान पटकावले

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने