झटपट पोलखोल न्यूज वृत्ताची दखल..* भडणे येथे पशुसंवर्धन विभागातर्फे जनावरांचे आरोग्य शिबीर संपन्न,

 




*झटपट पोलखोल न्यूज वृत्ताची दखल..*    भडणे येथे पशुसंवर्धन विभागातर्फे जनावरांचे आरोग्य शिबीर संपन्न,  

शिंदखेडा तालुका प्रतिनिधी दि.२० ( यादवराव सावंत )

शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे आज  रोजी पशुसंवर्धन विभाग यांच्या वतीने लंपी स्क्रीन जनावरा वरील आजाराचे आरोग्य शिबिर संपन्न झाले

भडणे परिसरात पंधरा दिवसापासून पशु जनावरांना,लंपि आजारांचे लक्षण जनावरांना दिसून आल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते यातच एका गरीब शेतकऱ्याचा 50 हजार रुपये किमतीचा बैल या आजाराने दगावल्याने भीती उत्पन्न झाल्याने भडणे येथील लोकनियुक्त सरपंच गिरीश देसले यांनी पशुसंवर्धन विभाग यांच्याशी संपर्क साधून शिबिराचे आयोजन करण्याची विनंती केली, होती आज सकाळी ठीक नऊ वाजता भडणे येथील दूध उत्पादक सहकारी सोसायटीचे चेअरमन अशोक पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले,यावेळी प्रमुख पाहुणे माजी सरपंच अशोक पाटील येथील प्रगतिशील शेतकरी विक्रम पाटील भडणे येथील,पोलीस पाटील युवराज माळी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते

गावातील जवळ पास 460 जनावरांना लसीकरण शिबिराचा लाभ देण्यात आला यावेळी आर,एन शिंदे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, विभाग शिंदखेडा डॉक्टर एच, डी पवार,उमेश पवार राकेश देवरे दिगंबर माळी राकेश बेहरे जितेंद्र कंरदील आर,र्एन पाटील युवराज देसले आधी डॉक्टरांनी हजेरी लावून आरोग्यसेवा पुरवली पशुपालक यांनी डाॅक्टर टीम व झटपट पोलखोल न्युज चॅनेल चे विशेष आभार मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने