*शिंदखेडा येथील साईलिला मित्र मंडळाच्या वतीने गणेश उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन*
शिंदखेडा तालुका प्रतिनिधी दि.२०
( यादवराव सावंत ) शिंदखेडा येथील विरदेल रोड वरील साईलिला गणेश मित्र मंडळाच्या वतीने विविध प्रकारच्या सांकृतिक कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले.हयात संगीत खुर्ची , लिंबू चमचा, फुगे फोडणे आदी प्रकारच्या खेळात काॅलनी येथील रहिवासी महिला व मुला मुलींनी मोठया प्रमाणावर सहभाग घेतला.सदर खेळाचा आनंद लुटला.दरवर्षाप्रमाणे हया मंडळाच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते म्हणून शहरातील अनेक मान्यवर उपस्थित राहुन सातत्याने होत असलेल्या कार्यकमाचे विशेष कौतुक केले. साईलिला गणेश मित्र मंडळाच्या पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.