*जळगांव ते भुसावळ दरम्यान रस्त्यांचे अपूर्ण काम पूर्ण..तरच टोल वसुली करा.. अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन.. जिल्हाधिकारींना निवेदन*
जळगावदि.२० (प्रतिनिधी)
जोपर्यंत जळगांव ते भुसावळ दरम्यान रस्त्यांचे अपूर्ण काम पूर्ण होत नाही तोपर्यंत वाहनधारकांकडून टोल वसुली नये अशी जोरदार मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक राजेंद्र निकम यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका पत्रकान्वये केली आहे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते,साधन सुविधा व आस्थापनाविभागातर्फे चिखली ते तरसोद या दरम्यान महामार्गाचे काम जवळपास पूर्ण झालेअसल्याने या महामार्गावर नशिराबादच्या पुढे दि.१६/०९/२०२१ पासून वाहनधारकांकडून टोल वसूलीस सुरुवात झालेली असून जळगाव जिल्ह्यातील वाहन धारकांसाठी सदरील कंपनी ८५/- रुपये प्रती वाहन या पध्दतीने पैसेआकारीत आहे. परंतु सदरील दर हा जळगांव शहरातील वाहनधारकांसाठी कमी म्हणजेच ३० ते ३५ रुपये प्रती वाहन आकारण्यात यावे.तसेच सदस्थितीत या रस्त्यावरील अनेक ठिकाणी कामे अपूर्णावस्थेतआहे. त्यातच जळगांव ते भुसावळ या दरम्यान विशेष करुन काम अपूर्ण असल्यामुळे सदरील रस्त्यावरुन वाहन धारकांना खूपच त्रास सहन करावा लागतआहे. त्यातच संबंधित टोल कंपनीने टोल वसूली सुरु केली असल्याने अपूर्ण काम राहिलेल्या रस्त्यावरच वाहनांच्यारांगाच रांग लागत असल्याने एखाद्या वेळेस त्याठिकाणी अपघात होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.तरी संबंधित रस्त्यांचे १०० टक्के काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत कुठल्याही वाहन धारकांकडून टोल वसूली करण्यात येऊ नये व तशा सूचना संबंधित टोल कंपनीस आपणांकडूनदेण्यात याव्यात. याउपर संबंधित कंपनीने टोल वसूली बंद केली नाही तर १० दिवसाचे आत संबंधित टोलनाका हा मनसे स्टाईलने बंद करण्यात येईल असा इशारा ही मनसेने दिला आहे.सदरील पत्रकावर मनसे जिल्हा संघटक राजेंद्र निकम,राजू बाविस्कर,महेश माळी,गणेश नेरकर,गोविंद जाधव,विशालकुमावत,निलेश अजमेरा,संतोष सुरवाडे,रमेश भोई,मनोज भोई,निलेश खैरनार,बळीराम पाटील,अॅड.दिनेशचव्हाण,मंगेश भावे,सिध्देस कवठाळकर, गोरख गायकवाड,अजय परदेशी,भाईदास बोरसे, संदिप पाटील आदी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.