जैविक इंधन क्रांती च्या महत्वाकांक्षी प्रकल्पाची राळेगाव तालुक्यात मुहूर्तमेढ*.. mcl व विठोबा ऍग्रो कपंनी चा संयुक्त उपक्रम, विदर्भात सर्वप्रथम राळेगाव तालुक्याची निवड

 

*जैविक इंधन क्रांती च्या महत्वाकांक्षी प्रकल्पाची राळेगाव तालुक्यात मुहूर्तमेढ*..  mcl व विठोबा ऍग्रो कपंनी चा संयुक्त उपक्रम, विदर्भात सर्वप्रथम राळेगाव तालुक्याची निवड  



 यवतमाळ दि.०४( जिल्हा अध्यक्ष शेख राजिक )

    पारंपरिक शेती पद्धतीत शेतकर्यांची लूटच होतंअसल्याचा  इतिहास आहे. पीकते ते खपत नाही अन खपते ते पीकत नाही ही अवस्था, सोबत अस्मानी सुलतानी संकटाचा ससेमीरा शेतकर्यांची पाठ सोडायला राजी नाही. अशा वेळी राळेगाव तालुक्यात बायोगॅस, सेंद्रिय खत निर्मिती व जैविक इंधन प्रकल्प आकारास येतं आहे.विशेष म्हणजे विदर्भात सर्वप्रथम राळेगाव तालुक्यात या प्रकल्पाची रुजूवात होतं आहे.  राळेगाव ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड व विठोबा माऊली प्रोड्युसर कपंनी च्या वतीने शेतकऱ्यांना स्यास्वत उत्पनाची हमी देणाऱ्या या  प्रकल्प| माहिती देण्यात आली. प. स. सभागृह राळेगाव येथे या बाबत पत्रकार परिषद घेण्यात आली. 

         या पत्रकार परिषदेला सभापती प्रशांत तायडे, माजी सभापती तथा प. स. सदस्य प्रवीण कोकाटे, कपंनी चे MD मिलिंद फुटाणे,जानराव गिरी, प्रदीप ठुने, अरविंद फुटाणे आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रकल्पाबाबत पॉवर प्रेझेंटेशन द्वारे प्रकल्पाची व्याप्ती, उपलब्धता,  शेतकऱ्यांचा बिगर शेतकऱ्यांचा  फायदा व पर्यावरण रक्षण या अंगाने विस्तृत माहिती देण्यात आली.  पोलूशन फ्री जैवीक इंधन, बायोगैस, व सेंद्रिय खत निर्मिती या अंतर्गत होणार आहे. प्रकल्पा करीता लागणारे हत्तीगवत बेणे , रोपे कपंनी मार्फत शेतकऱ्यांना पुरवण्यात येतील. या करीता बियाणे, खत, नींदनी चा कोणताच खर्च शेतकऱ्यांना येणार नाही. कपंनी किमान हमीभाव हजार रु. टनाने हे गवत खरेदी करेल.पहिल्या वर्षा पासून तर आठ वर्ष हे गवत उत्पन्न देईल.  कमीत कमी जरी उत्पन्न धरले तरी एकरी पाऊण ते एक लाखाचे बिनखर्ची उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती येईल. सोबतच रोजगाराच्या संधी देखील यातून निर्माण होणार आहे. पन्नास कोटी चा प्रकल्प राळेगाव तालुक्यातील देवधरी येथे आकारास येतो आहे. 

           राळेगाव तालुक्यात या शेतकरीहित केंद्रित उपक्रमाशी दहा हजार शेतकरी व बिगर शेतकरी  सभासदांना जोडन्याचे लक्ष ठेवण्यात आले असून, सभासद नोंदणी सुरु करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. 

         कपंनी सोबत जुडनाऱ्या प्रत्येक वेक्तीच्या हाताला कामं देण्यात येणार आहे. बचत गटाला या सोबत जोडून  प्रोसिसिंग युनिट तयार करण्यात येईल. शेतीतून गॅस निर्मिती या  महत्वाकांक्षी उद्योगाची मुहूर्तमेढ तालुक्यात होनार आहे. विदर्भात राळेगाव तालुक्यात सर्वप्रथम या कपंनीचे कामं सुरु झाले असून तालुक्यातील शेतकरी, बिगर शेतकरी यांच्या करीता आर्थिक उन्नतीचे दरवाजे खूले करणारा हा प्रकल्प असल्याने शेतकऱ्यांनी सभासद व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने