*शिंदखेडा शहरातील वीजपुरवठा सुरळीत करा.. अन्यथा रस्त्यावर उतरू .. वीजवितरण कंपनीचे अभियंता राठोड यांना शहर भाजपतर्फे इशारा*
शिंदखेडा- दि.०४ (यादवराव सावंत ,तालुका प्रतिनिधी) शिंदखेडा- शहरातील व परिसरात अनियमित व वेळोवेळी खंडित होणाऱ्या वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी शिंदखेडा शहर भाजपतर्फे वीज वितरण कंपनीच्या सहाय्यक श्री. राठोड यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.नगरपंचायत उपनगराध्यक्ष भिला पाटील , भाजपा शहराध्यक्ष प्रविण माळी ,अॅड. विनोद पाटील ,नगरसेवक चेतन परमार ,विनोद चौधरी यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की,अनेक दिवसापासून शहर व परिसरात अनियमित व वेळोवेळी वीज पुरवठा खंडित होत आहे.त्यामुळे शहर व परिसरातील नागरिकांना व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागत आहे.वेळोवेळी खंडित होणाऱ्या वीज पुरवठा यामुळे शहरातील सार्वजनिक पाणीपुरवठा पुरेशा प्रमाणात होत नाही. त्यामुळे शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे .त्यामुळे नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा होत नाही .म्हणून अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.शहरासह परिसरात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास शहर भाजपाच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. त्याचप्रमाणे नगरपंचायत शिंदखेडा मुख्खाधिकारी प्रशांत बिडकर सह प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे ,अभियंता ईश्वर सोनवणे यांनी देखील शहरातील वीज पुरवठा सुरळीत होईल यासाठी वीज वितरण कंपनीच्या अधिकारी यांनी निवेदन देण्यात आले