चोपडा दि.०४(प्रतिनिधी ) येथील सी.बी.एस.ई. बोर्ड मान्यता प्राप्त विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता दहावीची पहिल्या बॅचचा निकाल गुणवत्तेची परंपरा कायम ठेवत 100% लागला. गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे- शेख जुवेरीया नदीम अेहमद 98.4 % प्राप्त करत चोपडा तालुक्यात., विद्यालयात व मुलींमध्ये सर्वप्रथम तर धिरज देवेंद्र सोनवणे 96.8% प्राप्त करत तालुक्यात तृतिय., विद्यालयात द्वितीय, हर्ष स्वतंत्र्य जैन 95.2 % विद्यालयात तृतीय, शोभित अभयकुमार जैन 93.6 % विद्यालयात चतुर्थ, नेहा अनिल बाविस्कर 92.6 % विद्यालयात पाचवी तर विशेष योग्यतेत आफताब पटेल 89.4% ,रुद्राक्ष बच्छाव 80%, जमीला राजा 78.4 %,साहिल सोनटक्के 75.2 %, रोनक साळुंखे 75% ,ताहेर ट्रान्सपोर्टवाला 74%. संपूर्ण तालुक्यात पहिल्याच बॅचचे दोन विद्यार्थी तालुक्यात चमकले, विद्यालयाचा 100 %निकाल, 90 % च्यावर 5 विद्यार्थी, विशेष योग्यतेत 6 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 6 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 2 विद्यार्थी. या सर्व गुणवंत, यशवंत विद्यार्थी यांचे अभिनंदन व कौतुक संस्थेचे अध्यक्ष डॉ.विजय पोतदार, संस्थापक अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव अॅड रवींद्र जैन यांच्यासह सर्व विश्वस्त मंडळ, प्रिन्सिपल सुरेखा मिस्री, मुख्याध्यापक नरेंद्र भावे, मुख्याध्यापिका आशा चित्ते ,माधवी भावे यांच्यासह संपूर्ण शिक्षकवृंद, कर्मचारीवृंद ,पालकवर्ग यांनी अभिनंदन व कौतुक केले.
चोपडा तालुक्यात जुवेरीयाँ शेख इयत्ता दहावी सी.बी.एस.ई. बोर्ड परीक्षेत सर्वप्रथम तर धीरज सोनवणे तालुक्यात तिसरा
Zatpat Polkhol News
0
Zatpat Polkhol News
खानदेशातील वाचकाचे चाहते वृत्तपत्र *"दैनिक जनशक्ती*" या वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून 15 वर्षाच्या कारकीर्दीत समाज हिताचे लिखाण करून अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वपुर्ण योगदान दिले आहे. वृत्तपत्र क्षेत्रात जाहिरात, बातम्या सर्वच विभागात कामाची हातोटी असल्याने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे राजकीय. सामाजिक कार्यकर्त्यांना न्याय देऊन निस्वार्थी, निगर्वीपणे पुढे आलो आहे. शिवाय साप्ताहिक चौखंबा वृत्तपत्राचे उपसंपादक म्हणून काम केले आहे. "दिवाळी विशेषांक" खास शैलीत काढले आहेत. महाराष्ट्र 99 न्यूज चॅनेलचे उपसंपादक म्हणून कामगिरी बजावली आहे. आदिवासी, दिव्यांग दीन-दलित व वंचित समाज गोर गरिबांची सेवा अविरतपणे बजावित आहे. विविध संस्थांच्या माध्यमातून जनतेला सेवा देण्यासाठी तत्पर आहे. भ्रष्टाचार, अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी *"झटपट पोलखोल न्यूज"* लेखणी सुरूवात केली आहे.
भविष्यात सर्व सामान्य गोर गरिब व वंचित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वपुर्ण योगदान देणार असून अन्याय व भ्रष्टाचार विरोधी धारदार लेखनीने आवाज उठवून न्याय देण्यासाठी झिजणार आहोत. ग्रामीण भागातील विद्यार्थी, लोकांपर्यंत पोहोचून शासन योजना पोहचविण्याची मोलाची जबाबदारी पार पाडून जन जागृती अभियान राबविणार आहोत