रोजगार हमी योजना,गोठ बांधकाम व शोष गड्डा कामात प्रचंड भ्रष्टाचार.. चौकशी करा..जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन


 

रोजगार हमी योजना,गोठ बांधकाम व शोष गड्डा  कामात प्रचंड भ्रष्टाचार.. चौकशी करा..जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन 

गोंदिया( जिल्हा प्रतिनिधी) दि. 4 जुलै. जिल्हा परिषद, गोंदियाच्या अधिनस्त असलेल्या रोजगार हमी योजना तसेच गोठ बांधकाम योजना, सोस गड्डा या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाला असल्याने आणि  आता पर्यंत तक्रार करूनही योग्य ती चौकशी झाली नसल्याने तत्काळ चौकशी करण्याची मागणी ओमकार रेखलाल उपवंशी,  मुन्नालाल रूपचंद उपवंशी , योगराज बेरसिंग  उपवंशी यांच्या नेतृत्वाखाली   पिपरटोला  येथील नागरिकांनी जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन  देऊन करण्यात आली आहे. 

  ग्राम पंचायत देऊटोला सचिव, सरपंच, जे.ई रोजगार सेवक  यांनी आपसात समन्वय साधून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप करीत  चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

 शासकीय नियमांचे उल्लंघन करून मनमानी प्रमाणे कामे करीत आहेत. त्यात सपाटीकरण करण्याकरीता मजुरांना कामाला  न लावता शासनाची परवानगी न घेता यंत्राचा वापर  करून कामें करण्यात आली. गोठ्या मध्ये घर आणि घरामध्ये गोठा ज्यांच्याकडे जनावरे त्यांच्याकडे गोठा नाही, ज्यांच्या कडे जनावरी नाही त्यांच्याकडे गोठा  देण्यात आले आहेत .प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घर न बांधता ही पैसे देण्यात आले.  त्या लाभार्थिं असलेल्यांशी साठगाठ करून लाभ देण्यात आलेला आहे. गरजू लोकांना  मात्र डावलून कामे करण्यात आली आहेत. . जे लाभार्थी अंदाजे १० ते २० वर्ष बाहेर राहण्याकरिता गेलेले आहेत. त्यांना सुध्दा कागदावर लाभ देण्यात आले आहेत.  सोस गड्यामध्ये लाभार्थीकडे दीड बाय तीन चा गड्डा केलेला आहे. त्यांची रूपये एकुण ४९,३५० इतकी आहे. हे शोस गड्ढे इतक्या रूपयांचे आहेत काय. असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच

कोयलांचायत देऊटोला सचिव, सरपंच, जे.ई., रोजगार सेवक यांनी सर्व दुरसंचार विभागाचे टॉवर तीन ठिकाणी असलेले टॉवर देऊटोला ग्राम पंचायत,  पिपरटोला येथील जि. प. शाळा,  बिजईंटोला येथील अंगणवाडी परीसरामध्ये हे तीनही गांव गट ग्राम पंचायत मध्ये आहेत. जुनी ग्राम पंचायतीचे मटेरीयल व तसेच पिपरटोला गावातील जि.प.मटेरीयलची परस्पर विल्हेवाट शासनाची नियमावली न बाळगता स्वतःच्या स्वार्थासाठी लाभ घेतलेला आहे. जे लाभार्थी रोजगार हमी योजना कामांवर न जाता त्यांच्या खात्यामध्ये पैसे  आलेले आहेत असेही लाभार्थी आहेत. तरीपण या सर्व कामांची चौकशी करून नियमाप्रमाणे गैरअर्जदारावर फौजदार गुन्हा करण्यात यावा  अशी गावकरी लोकांनीमागणी आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने