साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती जळगावात उत्साहात साजरी

 



साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती जळगावात उत्साहात साजरी

जळगाव दि.०२(प्रतिनिधी)

तुकाराम भाऊराव ऊर्फ शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला.

अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अश्या अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनात्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला आदिवासी वाल्मीक लव्य सेना यांच्याकडून माल्यार्पण करण्यात आले आहे याप्रसंगी बापू शांताराम ठाकरे, आदिवासी  वाल्मीक लव्य सेनेचे जिल्हाध्यक्ष मोहन संकपाळ ,मातंग समाजाचे जिल्हाध्यक्ष सतिश गायकवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे हे या प्रसंगी उपस्थित होते हा कार्यक्रम नेरी नाका चौकामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या चौकात पार पडला आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने