उप पोलिस स्टेशन लाहेरी येथे ड्रायव्हिंग लायसन्स कॅम्पचे आयोजन.
गडचिरोली:दि. ( जिल्हा प्रतिनिधी चक्रधर मेश्राम) दि०२ :-
जिल्हा पोलीस प्रशासन व पोलिस स्टेशनला लाहेरी यांचे पुढाकाराने महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या विविध योजना ऑनलाईन सुविधा बाबत अनभिज्ञ असलेल्या नक्षलग्रस्त, अतिदुर्गम, अशिक्षित अशा लाहेरी परिसरातील नागरिकांसाठी उप पोलीस स्टेशन लाहेरी येथे ऑनलाइन ड्रायव्हिंग लायसन कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
28 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान सुरू असलेल्या नक्षल सप्ताहामध्ये पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक श्री मनीष कलवानिया, श्री सोमय्या मुंडे, श्री समीर शेख यांचे नेतृत्वाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी श्री कुणाल सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली लाहेरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री अविनाश नळेगावकर, पोलीस उपनिरीक्षक आकाश विटे, अजय कुमार राठोड, विजय सपकळ यांनी “पोलिस दादालोरा खडकी” अंतर्गत ऑनलाइन लायसन्स कॅम्पचे आयोजन केले होते. नक्षल सप्ताह सुरू असताना देखील लाहेरी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात निर्भिडपणे कॅम्पला हजेरी लावून पोलिसांप्रती व सरकारप्रती असणारा विश्वास दाखवून दिला. सदर कॅम्पचे उद्घाटन श्री साईनाथ गवारे, श्री सुरेश गवारे यांच्या हस्ते वीर बिरसा मुंडा यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केली. प्रमुख पाहुणे म्हणून लाहेरचे प्रतिष्ठित नागरिक श्री कोमटी ओकसा हे होते. सदर कार्यक्रमात पोलीस हवालदार अरुण कुमार टेकाम यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले. पोलीस उपनिरीक्षक आकाश विटे यांनी उपस्थित सर्वांना पोलीस दलातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजना, मध संकलन प्रशिक्षण, खावटी योजना तसेच उप पोलीस स्टेशन तर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देऊन लायसन ची आवश्यकता पटवून दिली व सदर योजना ही पोलीस स्टेशनला यापुढेही चालूच राहणार असल्याचे सांगितले. सदर शिबिरामध्ये पोलीस नाईक यशवंत दाणी यांनी एकूण 51 नागरिकांना लर्निंग ड्रायविंग लायसन्स काढून दिले. तसेच उपस्थित सर्वांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सदर ऑनलाइन लायसन कॅम्प यशस्वीरित्या पार पाडण्याकरता पोलीस हवालदार तुकाराम हिचामी, कोरके परसा, पोलीस नाईक फिरोज गाठले, महिला पोलीस नाईक वर्षा डांगे, पोलीस शिपाई डेविड चौधरी, संदीप आत्राम, ईश्वरलाल नैताम, नितीन कुमरे, सचिन सोयाम, पुरुषोत्तम कुमरे, नितीन जुवारे, उमेश कुनघाडकर, अमित कुलेटी, महिला पोलीस शिपाई सुजाता जुमनाके, रत्नमाला जुमनाके, सोनम लांजेवार, प्रनाली कांबळे, शोभा गोदारी सोनाली नैताम, योगिता हीचामी, चंदा गेडाम, वृषाली चव्हाण, रेश्मा गेडाम, प्रेमिला तुलावी, सविता लोणारे यांनी परिश्रम घेतले.