*जळगाव जिल्ह्यात चोपड्याचे कोतवाल जितेंद्र धनगर सर्वोत्कृष्ट.. प्रांताधिकारी यांचे हस्ते गौरव..*





*जळगाव जिल्ह्यात चोपड्याचे  कोतवाल जितेंद्र धनगर सर्वोत्कृष्ट.. प्रांताधिकारी यांचे हस्ते गौरव..* 

चोपडा दि.०२(प्रतिनिधी) दि 1 ऑगष्ट महसूल दिनी जळगाव जिलह्यातुन उत्कृष्ट कोतवाल म्हणून चोपड्याचे जितेंद्र धनगर यांची निवड

          दर वर्षी महसूल विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांचा पुरस्कार देऊन सम्मान करण्यात येतो. सन.2020  2021 ला जळगाव जिल्ह्यात उत्कृष्ट कोतवाल म्हणून चोपड्याचे जितेंद्र धनगर यांची त्यांच्या कार्याची दखल घेऊन  जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेब यांनी त्यांची निवड केली व  महसूल दिनी त्यांना गौरवण्यात आले.पण सद्या कोविड परिस्थिती लक्षात घेऊन जळगाव येथे कार्यक्रम न घेता अंमळनेर विभागाचे प्रांतधिकारी मॅडम सिमा आहिरे यांच्या हस्ते जितेंद्र धनगर यांना पुरस्कार देण्यात आला त्यावेळी चोपड्याचे तहसीलदार अनिल गावित व अमळनेर तहसीलदार मिलिंद वाघ उपस्थित होते. अमळनेर महसूल विभाग तसेच समाजातील सर्व स्तरातून त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने