चोपडा येथे अतुल्य वर्षावास कार्यक्रमास सुरूवात ..
चोपडादि.०२ (प्रतिनिधी) :--
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा जळगांव पूर्व यांच्या आदेशानुसार चोपडा शहर व तालुका शाखेच्या वतीने वर्षावास कार्यक्रम व प्रवचन मालिका कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा संघटक आयु.हितेंद्र बिरबल मोरे यांचे हस्ते दिपप्रज्वलन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन पंचशील नगर येथे करण्यांत आले.
यावेळी तालुकाध्यक्ष बापूराव वाणे यांनी वर्षावास कशा प्रकारे सुरु केला याबाबत भगवान सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या काळातील जीवनावर आधारीत व आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या कालावधीतच का करावा ? हे आपल्या धम्मदेशनेतून सविस्तर खुलासा केला.सदर वर्षावास प्रवचन मालिकेचे प्रास्तविक व सुत्रसंचलन शहराध्यक्ष भरत शिरसाठ यांनी केले.
या कार्यक्रमास हितेंद्र मोरे, बापूराव वाणे,भरत शिरसाठ, दिपक मेढे,रामचंद्र आखाडे, भगवान (छोटू) वारडे पत्रकार, देवानंद वाघ,संजय सांळुखे,सुधीर संदानशिव,प्रविण करंनकाळ,पंकज करनकाळ,संदिप भालेराव, सुनिता सपकाळे,अंकिता भालेराव,ज्योति भालेराव,सुमित बागुल आदि धम्म उपासक व उपासिका तसेच महासभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.शेवटी आभारप्रदर्शन संजय सांळुखे यांनी मानले .