सहाय्यक फौजदारांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यात पोलिसांचे डान्स नृत्य.. योग्य कि अयोग्य..? जनता दरबार तुम्हीच सांगा.. आपल्या सहकाऱ्याच्या आनंदी सोहळ्यात तुम्ही नाचणार का नाहीत..?
चोपडा दि.०३ (प्रतिनिधी): भुसावळ शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यास डान्स करणे पांच पोलिसांना चांगलेच महागात पडले .. त्या पाचही जणांची तडकाफडकी बदली आदेश निघाल्याचे वृत वायु वेगाने सर्वत्र पसरले खरे ..मात्र पोलिस बांधवांना म्हणा तथा एखाद्या प्रशासकिय अधिकारीस म्हणा. एखादं दुसऱ्या आनंदी सोहळ्यास नाच गाण्यावर खरोखरच बंदी आहे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.आपल्या कर्तव्य शिवाय यांच्या नशिबी सामुहिक कार्यक्रमांना आनंद लूटण्याची जणू कायमची पाबंदी आहे असं सर्व सामान्य नागरिकांमध्ये समज निर्माण होऊ पाहत आहे का?.अहो रात्री अपरात्री जनतेच्या संरक्षणार्थ ते डोळ्यात तेल घालून कामगिरी बजावत असतात.तेव्हा जनता मात्र सुखदायी झोपेचा परिपूर्ण लाभ उठवत असते फक्त न फक्त पोलिस दादांचे भरवशावर..मग अशा पोलीस बांधवांना आपल्याच सहकाऱ्याच्या सेवा निवृत्ती सोहळ्याचा आनंद लूटणेही .. डान्स गाण्यावर नृत्य करणे..आनंदावर पाणी फेरल्यासारखे झाले आहे.अहो शेट तुमचा लयं आहे थाट..आमची चांगलीच लावलीयं वाट..अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर येऊन ठेपली आहे. हे कितपत योग्य कि अयोग्य हे जनतेनेच ठरवावे..मात्र ते कर्तव्यावर असतील तर त्यांनीही आपले कर्तव्य कसे बजवावे.. हाही प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.
भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष आणि प्रहार पक्षाचे विभागीय अध्यक्ष अनिल चौधरी यांच्यासोबत एका पार्टीत ‘डान्स करणाऱ्या पाच पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. शहर पोलीस ठाण्याच्या या पाच पोलिसांना तडकाफडकी कंट्रोल जमा केल्याचे वृत्त आहे.
शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार वासुदेव सोनवणे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. सेवानिवृत्ती निमित्त रविवारी दुपारी रेल्वे स्टेशन परिसरात एका मॉलच्या सभागृहात पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत अनिल चौधरी हे शुभेच्छा देण्यासाठी पोहचताच ‘मैं हू डॉन’ गाणे वाजले. त्यांतर काही पोलीस कर्मचाऱ्यांनी ‘ओ शेठ तुम्ही नादच केला थेट’ या गाण्यावर अनिल चौधरींसोबत ठेका धरला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई सुरु झाली.
पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय येरुळे यांना तोंडी आदेश देऊन पाचही पोलिसांना कंट्रोल रूम जमा केले.