पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के....

  



पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के....

चोपडा दि.०३ (प्रतिनिधी) :---

    पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल या शाळेचा  इयत्ता दहावीचा (सी बी .एस. ई) निकाल नुकताच लागला असून त्यात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून सिया हरिश्चंद्र अग्रवाल 93.80 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला. तसेच हर्षद सुशिल महाजन या विद्यार्थ्याने 93.60 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला. कृष्णा जयंत महाजन या विद्यार्थ्याने 93.00 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकविला आहे . विद्यालयातील 56 पैकी 9 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.

यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे उपाध्यक्ष  अविनाश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तसेच संचालक पंकज बोरोले,  भागवत भारंबे,एम .व्ही पाटील, व्ही .आर .पाटील, डॉ किशोर पाठक, नीता पाटील, रेखा पाटील आदींनी अभिनंदन केले. प्राचार्य मिलिंद पाटील,  के .पी .पाटील, धनश्री पाटील, किरण चौधरी,  कृष्णकुमार शुक्ला,  चंद्रकांत पाटील, इब्राहिम तडवी  या  शिक्षकांच्या अथक परिश्रमाचे हे फलित असल्याचे प्राचार्य मिलिंद पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने