*आदिवासी पाड्या-वस्त्यांमध्ये भेडसावत असलेली वीज सोडविण्यासाठी धानोरा वीज उपकेंद्रासाठी ३५ कोटींचा निधी मंजूर.. आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे*


 


*आदिवासी पाड्या-वस्त्यांमध्ये भेडसावत असलेली वीज सोडविण्यासाठी धानोरा वीज उपकेंद्रासाठी ३५ कोटींचा निधी मंजूर.. आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे* 


अडावद  (ता. चोपडा), ता. ०३ : येथील वीज उपकेंद्रासाठी ३५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या प्रकल्पासाठी अंदाजित ७८ कोटी रुपये लागणार आहेत. त्यापैकी ३४ कोटी रुपये मंजुरी मिळाल्याचे आमदार लता सोनवणे यांनी सांगितले. तसेच येत्या दोन-तीन महिन्यांत प्रत्यक्षात सुरवात होणार आहे. कामासही

चोपडा तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून विजेच्या समस्या आहेत. यातच धानोरा तथा परिसरात, आदिवासी वाड्या-वस्त्यांवर वारंवार वीज जाणे, तारा तुटणे, कमी प्रमाणात वीजपुरवठा होत असे. यामुळे ग्रामस्थांना तासन् तास वीज मिळत नसे. तसेच परिसरात बहुतांशी शेतकरी बागायतदार असल्याने पिकांना पाणी देणे अत्यावश्यक असते. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून माजी आमदार चंद्रकांत सोनवणे हे २०१६ पासून प्रयत्न पाठपुरावा सुरू ठेवल्याने मंजुरी मिळाली आहे. उर्वरित निधीसाठी देखील पाठपुरावा करूअसे. - आमदार सौ.लता सोनवणे, , चोपडा यांनी सांगितले .त्यानुसार आमदार सौ.लता सोनवणे यांनीही पाठपुरावा सुरूच ठेवला. यामुळे धानोरा गावातील वीज उपकेंद्राशेजारी दहा एकर गावठाण जागेत १३२ के.व्ही.चे सुसज्ज मोठे स्टेशन बांधले जाणार आहे. यामुळे विजेची समस्या कायमस्वरूपी सुटणार आहे. या बांधकाबाबत लवकरच पाहणी करून ई-टेंडर काढून प्रत्यक्षात कामाला सुरवात होणार आहे.धानोरा येथे १३२ केव्ही स्टेशन पूर्ण झाल्यावर किनगाव, डांभुर्णी, चिंचोली, अडावद आदी ३३ केव्ही होणार आहे 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने