चोपडा न. पा.वर नगरवासियांचा गदारोळ.. भरगच्च असुविधा.. एस. टी. कॉलनीकरांची शाब्दीक चढाई..दोन दिवसाचा दिला शब्द





चोपडा दि. 1 (प्रतिनिधी) चोपडा शहरातील एसटी कॉलनीत नगरपालिका प्रशासनामार्फत कोणत्याही प्रकारच्या सोयी – सुविधा मिळत नसल्याच्या आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे तसेच एस टी कॉलनीत चुकीच्या पद्धतीने अंडरग्राउंड पाईप गटार केली असून सदर गटारीतून कोणत्याही घराच्या पाण्याचा निचरा होत नसून कॉलनी वाशियांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे . सदर गटारातून पाण्याच्या निचरा होत नाही , घरातील सांडपाण्याचे पाईप देखील भरले आहेत, गटार अंडरग्राउंड असल्यामुळे पावसाचे पाणी देखील पावसाळ्यात घरात शिरते व रस्त्यावर देखील साचते , त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे .

नगरपालिकेला वारंवार निवेदने देण्यात आली आहेत पण नगरपालिकेचे मुख्याधिकारी अविनाश गांगोडे व गटनेते जीवन चौधरी फक्त आश्वासने देतात पण प्रत्यक्षात कृती अजिबात करीत नाहीत. सकाळी घंटागाडीच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियानाच्या खोटा बोभाटा केला जातो पण मात्र चोपडा शहरात स्वच्छ भारत अभियानाची प्रत्यक्षात अंमलबजावणी अजिबात दिसून येत नाही असा संतप्त आरोप एसटी कॉलनी वाशीयांनी नगर परिषदेच्या आवारात केला आहे .

दिनांक 30 जून वार गुरुवार रोजी नगर पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मीटिंग सुरू असताना एसटी कॉलनी वाशीय स्त्री-पुरुष ,आबालवृद्ध मोठ्या संख्येने आले असता त्यांनी थेट सभागृहात जाऊन नगराध्यक्षा मनीषा चौधरी व मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांना सुविधा मिळत नसल्याबाबत व नगरपालिकेकडून कोणतेही सहकार्य मिळत नसल्याबाबत अनेक प्रकारच्या बाबी लक्षात आणून दिल्या व नगरपालिका प्रशासन कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा पुरवत नसून मात्र भरमसाठ कर वसुली करते .जर येत्या दोन दिवसात सुविधा मिळाल्या नाहीत तर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे कॉलनी वासीयांनी सांगितले आहे .यावेळी नगरपालिका मुख्याधिकारी अविनाश गांगोडे व कॉलनीवाशिय यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची देखील झाली .त्यावेळी काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते .शेवटी मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी येत्या दोन दिवसात एसटी कॉलनीतील सर्व सुविधा नियमित केल्या जातील असे आश्वासन दिले तेव्हा एस टी कॉलनी वाशीय येथील रहिवाशांनी दोन दिवसाच्या अल्टिमेटम दिला आहे जर दोन दिवसात नपा प्रशासनाने सहकार्य केले नाही तर यापेक्षा मोठा उद्रेक होईल असा इशारा देण्यात आला आहे .

यावेळी शुभम अनिल चौधरी, रमेश दगडू बडगुजर, राहुल अनिल चौधरी ,बाबूलाल दयाराम बुवा ,रवींद्र पाटील ,राजेंद्र बडगुजर, विष्णु सिंधी , धनराज पाटील, विजय बडगुजर, रमेश बडगुजर ,चंपालाल जयस्वाल, सुधाकर पाटील ,चंद्रकांत देवरे, कैलास बडगुजर ,गणेश सोनार, किशोर बडगुजर यासह महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने