*चांदवड तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख,मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरेसाहेब व उपजिल्हाप्रमुख नितीनदादा आहेर यांच्या वाढदिवसानिमित्त आशा सेविकांचे कोरोना योध्दा म्हणून सत्कार*
नासिक दि.२८ (जिल्हा प्रतिनिधी: सुनिलआण्णा सोनवणे)
चांदवड तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख,मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरेसाहेब व उपजिल्हाप्रमुख मा.नितीनदादा आहेर यांच्या वाढदिवसानिमित्त दि.२७/०७/२०२१ रोजी वडाळीभोई प्राथमिक आरोग्य केंद्रात शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीनदादा आहेर यांच्या हस्ते आज आशा सेविकांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला,याप्रसंगी दादांनी आशा सेविकांना मार्गदर्शन केले, याप्रसंगी बोलतांना आशा सेविकांना कोरोनांच्या काळात स्वतःची जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा केली,यापुढेही तुमचे काम असेंच चालू ठेवावे,व जेव्हाही तुम्हाला काही अडचणी आल्यास शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील अशी ग्वाही दादांनी दिली,याप्रसंगी आशा सेविकांना पावसाळ्याचे दिवस असल्याने छत्री वाटप,व कोरोना योध्दा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला,याप्रसंगी तालुका प्रमुख विलासनाना भवर,महिला आघाडीप्रमुख अर्चनाताई पुरकर,तालुका संघटक,केशव ठाकरे,जिल्हापरिषद सदस्य कविता ताई धाकराव, तालुका समन्वयक सोमनाथ पगार,उपतालुका प्रमुख रवी काळे , गटप्रमुख अशोक शिंदे,घमाजी राजे सोनवणे,रवि पूरकर,प्रदिप आहेर,नवनाथ भवर,गणेश जाधव उपस्थित होते