*शिंदखेडा येथील कारगिल युद्धात सेवा बजावणारे जोशी दांपत्याचा सत्कार*
शिंदखेडा दि.२७ तालुका प्रतिनिधी (यादवराव सावंत)। शिंदखेडा-26 जुलै हा दिवस साऱ्या देशभर कारगिल विजय दिवस संपन्न होत असताना प्रत्यक्ष कारगिल युद्धात सुभेदार पदावरून जबाबदारी पार पाडून आज सुमारे 30 वर्ष सेवा देशसेवेसाठी रुजू करणारे सेवानिवृत्त प्रकाश जोशी व त्यांच्या पत्नी सौ जोशी या दाम्पत्याचा त्यांच्या शिंदखेडा येथील बिके देसले नगरमधील निवासस्थानी जाऊन नगरसेवक सुनीलभाऊ चौधरी, पत्रकार प्रा प्रदीप दीक्षित ,जितेंद्र मेखे ,अशोक गिरनार, योगेश चौधरी यांनी सत्कार केला प्रसंगी प्रकाश जोशी यांनी कारगिल युद्धात पार पडलेली जबाबदारी कथन केली ऐकतांना अंगावर शहारे येत होते प्रत्यक्ष काय परिस्थिती जोशींनी अनुभवली असावी हा विचार मनाशी येत राहिला सेवानिवृत्त प्रकाश जोशी सौ जोशी यांनी धन्यवाद व्यक्त केले