*शिंदखेडा येथे कारगिल दिवसाच्या एक वर्ष वृक्षलागवड पुर्ती वृक्षसंवर्धन समितीच्या वतीने वृक्षाचा वाढदिवस साजरा
शिंदखेडा दि.२७ :तालुका प्रतिनिधी (यादवराव सावंत)। शिंदखेडा येथे एक वर्षापूर्वी 26 जुलै 2020 रोजी "कारगिल विजय दिवसाचे" औचित्य साधून वृक्ष संवर्धन समिती, खान्देश रक्षक व द रनर्स ग्रुप शिंदखेडाच्या संयुक्त विद्यमाने मान्यवरांच्या हस्ते साईलिला गार्डन मध्ये 110 वृक्ष लागवड करण्यात आली होती. आज 26 जुलै 2021 रोजी एक वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. अनेक अडचणीनां सामोरे जाऊन लावलेली पूर्णच चा पूर्ण 110 झाडे जगली आहेत. या गोष्टीचा आम्हाला खरंच खूप आनंद होत आहे. आनंद द्विगुणित व्हावा म्हणून. झाडांचा वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले. यात माझी मुलगी समृद्धी (माऊ) ही प्रतिकात्मक झाड बनली होती. तिचा हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी चिमुकले व वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष योगेश चौधरी, जीवन देशमुख,राजेंद्र मराठे,रोहित कौठळकर,यश मराठे आदी सदस्य उपस्थित होते.*