*शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा गावाजवळ रस्त्यावरील जमीन धसल्याने बसही उलटली; सुदैवाने जीवित हानी टळली*
शिंदखेडा दि.२७ तालुका प्रतिनिधी ( यादवराव सावंत )। शिंदखेडा - मुसळधार पावसाने राज्यात हाहाकार माजवला असताना धुळे जिल्ह्यात रिमझिम पाऊस होत आहे. यामुळे देखील रस्त्यांची समस्या होत आहे. यात वालखेडा गावाजवळ रस्त्याच्या कडेवरची जमिन खचल्याने प्रवाशांनी भरलेली बस उलटली. सुदैवाने यात हानी झाली नाही.
शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा गावाजवळ सोनगीरहून अमळनेरकडे जाणारी बस (क्र. MH २०, BL १४१८) रस्त्याच्या खाली उतरताच भुसभुशीत झालेल्या जमिनीमुळे जागीच पलटी झाली. जमीन धसल्यामुळे ही बस अचानक पलटी झाली आहे. बसमध्ये १५ ते २० प्रवासी प्रवास करीत होते. सुदैवाने या बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना कुठल्याही प्रकारची इजा झाली नसून सुदैवाने या दुर्घटनेमध्ये जीवित हानी टळली आहे.
त्यात प्रवाशी झाले भयभीत
अचानक रस्त्यावरून बस पलटी झाल्याने सर्व प्रवासी भयभीत झाले होते. आरडाओरड देखील झाली. मात्र बसचा खालचा भाग टेकला गेल्याने बस उलटी झाली झाली नाही. यामुळे प्रवाशांना इजा झाली नाही. परिसरातील नागरिकांनी तात्काळ सर्व प्रवाशांना खिडकीतून बाहेर काढले. या दुर्घटनेमध्ये बसच्या एका बाजूच्या संपूर्ण काचा फुटल्याने बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.