*मानव सुरक्षा सेवा संघाच्या राज्य कार्याध्यक्षपदी .. डॉ.रहेमान सुभान खाटीक यांची नियुक्ती.. सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव*
अमळनेर दि.२७(प्रतिनिधी) तालुक्यातील पाडसे येथील रहिवासी डॉ. रहेमान सुभान खाटीक यांची नुकतीच मानव सुरक्षा सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष पदासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
अशा आशयाचे पत्र संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष मा. अमोलभाऊ राखपसरे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे राज्य अध्यक्ष मा.ॲड. बशीरभाई भुरे यांच्याकडून वाटस्ऐपद्वारे पाठवण्यात आले असून संघटनेच्या इतर पदाधिकारींनी निवडीचे स्वागत केले आहे. संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारींनी आपल्यावर विश्वास दाखवून जी जबाबदारी दिली आहे त्याला न्याय देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन अशी ग्वाही देऊन डॉ. रहेमान खाटीक यांनी संघटनेचे आभार मानले आहेत.
मानव सुरक्षा सेवा संघ ही संघटना अधिकृत शासनमान्य राष्ट्रीय संघटना असून समाजातील प्रत्येक घटकांतील पिडीत जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, अन्याय अत्याचार विरूद्ध लढणारी अ-राजकीय संघटना आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मा. अमोलभाऊ राखपसरे आणि महाराष्ट्र राज्यात कार्यसम्राट राज्य अध्यक्ष मा. ॲड. बशीरभाई भुरे यांच्या नेतृत्वात फारच अल्प कालावधीत संघटनेने फार मोठी मुसंडी मारलेली असून प्रत्येक क्षेत्रातील अनेक महिला/ पुरुष अभ्यासू, तज्ञ आणि प्रामाणिक पदाधिकारींच्या मेहनतीच्या बळावर संघटनेचे कार्य जोमाने सुरू आहे. अनेक प्रकरणांत पिडीतांना न्याय मिळवून दिलेला आहे.
तरी सामाजिक क्षेत्रात समाजसेवेचे व्रत घेतलेल्या तळागाळातील बंधू आणि भगिनी जे अहोरात्र पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतात परंतु कधी कधी मुजोर आधिकारी आणि नेते एकट्या दुकट्याला जुमानत नाहीत. आर्थिक अडचण आणि वशिला नसल्याने आपण आपली बाजू भक्कम असूनही, योग्य असूनही आपण काही ठिकाणी कमी पडतो. तरी 'एकीचे बळ मिळते फळ' या उक्तीप्रमाणे आपल्याला आणि संघटनेला बळकटी देण्यासाठी समाजसेवकांनी राष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या अधिकृत शासनमान्य मानव सुरक्षा सेवा संघ या संघटनेत सामील होण्यासाचे आवाहन नवनियुक्त राज्य कार्याध्यक्ष डॉ. रहेमान खाटीक यांनी केले आहे.