*शिंदखेड्यात माझी वसुंधरा अभियानांतर्गत वृक्षारोपण*
*नगरपंचायत व वृक्ष संवर्धन समितीचा उपक्रम-शहरात ५०* *रोपांची लागवड।**
शिंदखेडा तालुका प्रतिनिधी ( यादवराव सावंत )
शिंदखेडा - माझी वसुंधरा अभियानातंर्गत नगरपंचायत शिंदखेडा व वृक्ष संवर्धन समितीच्या वतीने शहरातील वॉटर सप्लाय येथील मोकड्या जागेत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रशांत बिडकर व वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष योगेश चौधरी यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.
याप्रसंगी नगर अभियंता ईश्वर सोनवणे, नगर रचनाकार ओमकार सहाने, वृक्ष संवर्धन समितीचे राजेंद्र मराठे, रोहित कौठळकर, जीवन देशमुख, यश मराठे उपस्थित होते.
आज पहिल्या टप्यात 50 रोपांची लागवड करण्यात आली. यात निंब, आवळा, शिसम, गुलमोहर, जांभूळ समावेश आहे. याच प्रमाणे पुढील टप्पात शहरातील विविध भागातील मोकळ्या जागेत नगरपंचायत शिंदखेडा व वृक्ष संवर्धन समितीच्या माध्यमातून वृक्षरोपण करून संवर्धन करण्यात येईल असे मुख्याधिकारी प्रशांत बिडकर यांनी सांगितले. तसेच शहरातील विविध सामाजिक संस्थांनी देखील या उपक्रमात सहभागी व्हावे. असे आवाहन श्री प्रशांत बिडकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नगरपंचायतीचे कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.