शिंदखेडा येथील आदिवासी एकता परिषदेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन- नऊ ऑगस्ट ला शासकीय सुटीची मागणी*

 



*शिंदखेडा येथील आदिवासी एकता परिषदेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन- नऊ ऑगस्ट ला शासकीय सुटीची मागणी*   

शिंदखेडादि.२७ : तालुका प्रतिनिधी ( यादवराव सावंत)।              शिंदखेडा येथील आदिवसी एकता परिषदेच्या वतीने जागतिक आदिवासी गौरव दिवस "नऊ ऑगस्ट" संबध भारत देशात मोठ्या उत्साहात आदिवासी समाज बांधव सण साजरा करित असतात,विविध जाती धर्माच्या थोर महापुरुषांच्या जयंती,पुण्यतिथी ला शासकीय सुटी देण्यात येते मात्र आदिवासी समाजातील विविध संघटनेच्या माध्यमातून नऊ ऑगस्ट रोजी शासकीय सुटी साठी अनेकदा दरवर्षी मागणी केली जाते पण हयाकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे, हयासाठी विविध संघटना एकवटल्या असुन शिंदखेडा येथील आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे, त्यांच्या माध्यमातुन महामहिम भारताचे राष्ट्रपती यांना सादर केले जाणार आहे मागणी मान्य न झाल्यास आदिवासी समाज रस्यांवर उतरुन तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला, यावेळी आदिवासी एकता परिषदेचे तालुकासचिव गुलाब सोनवणे,उपसचिव भुपेंद्र देवरे,सल्लागार शानाभाऊ सोनवणे,अजय मालचे,जितु मालचे,छोटु सोनवणे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने