प्रामाणिकपणे रखवाली करणारा पाळीव कुत्र्यावर .. बिबट्याचा हल्ला.. परिसरात प्रचंड घबराहट..ट्रॅप कॅमेऱ्यात फोटो सापडता सापडेनात..अन् पिंजरा लागता लागेना..वन अधिकाऱ्यांनो काही तरी उपाय शोधा..माणसे मंत्र्यांची वाट पाहतायं का? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल
लखमापुर ता. दिंडोरी दि.२६ (प्रतिनिधी) येथील माजी सरपंच आनंदराव मोगल यांच्या पाळीव कुत्र्यावर सकाळी आठ वाजेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हाल्यात कुत्रा ठार झाल्याची घटना घडली आहे. विशेषतः बिबट्याचा हल्ला रात्रीच्या वेळी होत असल्याचे शासन व अधिकारी सांगतात मात्र सध्या परिसरात भर दिवसा होणारे हल्ले छातीत धडकी ठरायला लावणारे आहे. लखमापुर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून बिबट्याच्या अनेक घटना घडल्या असून काही लहान बालकांचे प्राण पण गेले आहे. पाळीव कुत्रे व लहान वासरे यांची तर गणती सुद्धा लागत नाही या भागातील जवळपास कुणाचेही पाळीव कुत्रे जिवंत राहिले नाहीत.
सध्या शेतात शेतमाल निंदणी लावणी सुरू आहे. मात्र कुठे ना कुठे होणाऱ्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या बाबत समजलेल्या माहिती नुसार बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावायचा झाल्यास त्या साठी ट्रॅप कॅमेऱ्यात फोटो येणे गरजेचे आहे मात्र तो पर्यंत सर्व संपलेले असते या मुळे बिबट्याच्या हल्ला झाल्याचा पुरावा मिळाल्या नंतर तात्काळ पिंजरा लावल्याची परवानगी मिळण्याची गरज असल्याची मागणी शेतकरी करत आहे.
लोकांसाठी कुत्रा प्राणी असतो मात्र शेतकऱ्यांसाठी तो राखणदार असतो, इतकेच काय पण तो घरातील सदस्या पेक्षा कमी नसतो मात्र, शासनाच्या धोरणा नुसार त्याला अजिबात किंमत दिसत नाही या मुळे आमचे वारंवार बिबट्याच्या हल्ल्यात जाणारे पाळीव प्राणी जणू बिबट्याला खाण्यासाठी पाळतो की काय असा प्रश्न निर्माण होतो :- आनंदराव मोगल लखमापुर