*जळगांव उप महापौरांच्या गाडीवर गोळीबार ..चौघा संशयितांविरुद्ध गुन्हा.. काहींना जामनेर तालुक्यातील मालेखेडा गावांतून घेतले ताब्यात..*
जळगाव दि.२६(प्रतिनिधी): महापालिकेचे उप महापौर कुलभूषण पाटील यांच्या तक्रारीवरून चार संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर आज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उमेश राजपूत, महेंद्र राजपूत, किरण राजपूत, मंगल राजपूत व बिऱ्हाडे नावं माहीत नाही.यातील काहिंना जामनेर तालुक्यातील मालेगाव येथून ताब्यात घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जळगावचे उप महापौर कुलभुषण पाटील यांच्या घराच्या दिशेने काल रात्री गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान गोळीबाराच्या या घटनेने जळगाव शहर व परिसरात खळबळ माजली होती हे. सदर गोळीबार हा पुर्ववैमनस्यातून झाला असल्याचे समर्थन केले जात आहे. प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार गोळीबार करणारे हल्लेखोर चारचाकी वाहनातून आले होते.
उप महापौर कुलभुषण पाटील हे जळगाव शहराच्या पिंप्राळा या उपनगरात मयुर काॅलनीत राहतात. त्यांच्या घराच्या दिशेने करण्यात आलेल्या गोळीबारात ते सुदैवाने बचावले . जळगावचे उप – महापौर या घटनेप्रकरणी तक्रार देण्यासाठी रामानंद नगर पोलिस स्टेशनला दाखल झाले होते. दरम्यान या घटनेने जळगाव शहराच्या राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.