शिंदखेडा दि. 1(प्रतिनिधी) आज दिनांक 1-7-2021 रोजी चिलाणे ता. शिंदखेड़ा येथे महारास्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री,हरित क्रांतीचे प्रणेते आदरणीय कै.वसंतराव नाईक साहेब यांचे जयंती निमित्त कृषी दिन म्हणून कृषी विभागा मार्फत दर वर्षी साजरा केला जातो त्याप्रमाणे यावर्षी चिलाणे येथे बहुसंख्य शेतकरीवर्गाने उपस्थित देऊन साजरा करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्री. वीरेंद्रसींग गिरासे, श्री.कृषी अधिकारी विनय बोरसे,आदर्श शेतकरी श्री.इलियास कुरेशी,श्री.प्रकाश पाटील,कृषी विस्तार अधिकारी श्री.डी.बी.पाटील यांनी शेतकरी यांना भाषणातून मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास पंचायत समितीचे सभापती सौ.वैशालीताई पाटील,उपसभापती श्री.नारायणसिंह गिरासे,पंचायत समिती सदस्य श्री.प्रविण मोरे,श्री.सोनवणे काका,गटविकास अधिकारी श्री.संजय सोनवणे,सहा.गटविकास अधिकारी श्री.,सामाजिक कार्यकर्ते श्री.अरुण पाटील, श्री.वीरेंद्र पवार,कृषी अधिकारी श्री.योगेश गिरासे,कृषी विस्तार अधिकारी श्री.देवरे,श्री.कोळी,कृषी विभागाचे कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.