दोंडाईचा दि. 1 : दोंडाईचा येथील भाजपा मा. नगरसेवकाच्या फोनला भाजपा आमदाराने ठेंगा दाखवला तर प्रहारचे ना. बच्चू कडू यांनी अवघ्या वीस मिनिटात कार्यकर्ते दवाखान्याचे बील कमी करण्यासाठी भाजपा आमदाराने दाखवला ठेंगा.. तर ना. बच्चू कडूंनी दाखवला इंगा.. भाजपा पेक्षा प्रहार बरे.. भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर..!र्ते पाठवून दवाखानयाचे बील कमी करून दिल्याने सदरील महिलेचा जीव आल्याने भाजपा कार्यकर्ता होण्या पेक्षा प्रहार कार्यकर्ताचा होऊन लोकसेवेसाठी मदतीचा हातभार* चांगले आहे असे मत नगरसेवक राकेश प्रल्हाद पाटील यांनी व्यक्त केले आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, दोंडाईचा शहराचा 35 वर्षापासून एकनिष्ठेने काम करणारा भाजपा कार्यकर्ता ची पत्नी आजारी असल्याने नाशिक येथील *नारायणी* हाॅस्पिटल येथे अॅडमिट होती सदरहू डाॅक्टर यानी उपचार आणि मेडिकल याचा 30000 ते 35000 च्या जवळपास खर्च येईल असे सांगितले असताना मेडिकल सह 65000 बिल आकारणी केली. त्यावेळी त्याना विनंती केली असता काही एक उपयोग होत नव्हता, पैसे देखील नव्हते तेव्हा तेथील बाजूच्या पेशंटने सांगितले की आमदाराची ओळख असेल तर त्याना फोन करायला सांगा बिल कमी होवून जाईल त्यावेळी त्याने त्याच्या पक्षाचे पाणीदार आमदार याना फोन केला त्यावेळी त्यांचे पी.ए. यांनी फोन उचलला त्यांना सांगीतले की मला आमदार साहेबांशी बोलायचे आहे, दवाखान्याचे अर्जंट काम आहे त्यावेळी त्यांनी सांगितले की मीटिंग सुरू असून मी त्यांना नंतर सांगतो ,काम काय ते सांग... त्याने दवाखान्याचे अडचण सांगितली त्यावेळी त्याने उत्तर दिले की नाशिकचे भाजपा नगरसेवक मी पाठवतो तुझे काम होऊन जाईल परंतु चार तास, पाच तास झाली त्यानंतर 24 तास गेलीत तरी देखील नाशिकचे भाजपा नगरसेवक आले नाहीत तसेच पाणीदार आमदार यांचा देखील फोन दवाखान्यात आला नाही. त्या बिचार्याने दवाखान्याचा नंबर ,दवाखान्याची फाईल पाठवून मदतीची अपेक्षा केली होती . त्यांच्या कडून साधा फोन करण्याची देखील मदत होत नाही.त्यावेळी त्यांनी प्रहार संघटनेचे दोंडाईचा येथील कार्यकर्त्यांशी संपर्क साधून त्यांना सर्व माहिती सांगितली त्यावेळी त्यांनी प्रहार चे आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या PA ला फोन करून समस्या सांगितली. त्यावेळी त्यांनी फक्त पंधरा ते वीस मिनिटाचा कालावधीत त्यांचे चार कार्यकर्ते दवाखान्यात पाठवले त्यात नाशिकचे दत्तू भाऊ बोडके हे आलेत आणि त्यांनी दवाखान्याच्या प्रशासनाला धारेवर धरत अवाजवी बिल आकारल्या बद्दल जाब विचारला त्यावेळी त्यांनी पंधरा हजार रुपये बिल कमी केले अडचणीच्या काळात मदत करून सहकार्य केले असे कृतिशील आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते यांची मदत पाहून तो लज्जित झाला. ज्या भारतीय जनता पार्टीचे गेली बत्तीस वर्षे झाली प्रामाणिकपणे काम केले, आमदार यांचे प्रामाणिकपणे काम केले तरीदेखील फक्त एक फोन लावून मदतीचा हात दिला नाही .त्याला प्रश्न पडला की अशा वेदनाहीन आमदाराचे काम का म्हणून करावे ? त्यापेक्षा प्रहार सारख्या चांगल्या संघटनेचे काम करून लोकांना मदत करावी अशी भावना निर्माण झाली आहे ह्या पत्राद्वारे शेवटी एकच सांगावेसे वाटते कार्यकर्ते यानी केलेल्या कामाचे फळ सत्तेची पद रूपात जरी दिली नाही तरी चालेल परंतु अडचणीच्या काळात मदतीसाठीा उभे राहिले पाहिजे . कार्यकर्ते साठी साधा एक फोन देखील न करणे हि बाब मनाला चटका लावून जाणारी आहे अशी दैनीय अवस्था भाजपचा निष्टावन कार्यकर्ताची आहे तर सामान्य कार्यकर्ते यांची काय परिस्थिती असेल याचा विचार न केलेलाच बरा .शेवटी एकच सांगावेसे वाटते. नाही सुखात तर दुःखात तरी कामास आले पाहिजे . तरच तो खरा लोकप्रतिनिधी होय ... असे मत राकेश प्रल्हाद पाटील.. मा नगरसेवक तथा पत्रकार यांनी व्यक्त केले आहे