विरदेल ते आच्छी रस्त्याचे वाजले तीन तेरा..तरीही बांधकाम विभागाचा ऐटीत तोरा.. रस्ता कमी खड्ड्यांची गर्दी..जनमाणसांत प्रचंड असंतोष..*






 *विरदेल ते आच्छी रस्त्याचे वाजले तीन तेरा..तरीही बांधकाम विभागाचा ऐटीत तोरा.. रस्ता कमी खड्ड्यांची गर्दी..जनमाणसांत प्रचंड असंतोष..* 

शिंदखेडा दि.२८(प्रतिनिधी रवी शिरसाठ) तालुक्यातील विरदेल ते आच्छी रस्ता प्रचंड खराब झाला असून संबंधित बांधकाम विभाग वा लोक प्रतिनिधी ढूंकनही पाहायला तयार नाहीत यामुळे भागातील जनतेला नाहक त्रासाला बळी पडावे लागत.'रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते 'हे सागणेही कठीण होऊन बसले आहे.तरीही या निगरगट्ट अधिकारी व लोकसेकांना कोणत्याही प्रकारचे सोयरसुतक नसल्याने नागरिकांनामध्ये विद्रोहजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.ह्या  रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील जनतेने दिला आहे.

 विरदेल ते आच्छी व हीसपुर या गावचे अंतर साधारण 7/8 की. मीटर आहे गेल्या दीड ते दोन वर्षापासून परिसरातील लोकांनी रस्ता दुरुस्तीचा रेटा लावून धरला आहे काहींची चप्पल घासून गेली मात्र या रस्त्याचे नशिब खुलवणारे कुंभकर्णी झोपेत आहेत की काय?असा प्रश्न निर्माण झाला आहे .तरी हा रस्ता ची खूप वाईट अवस्था आहे गुढगे यवढे खड्डे आहेत व गावातल्या लोकांना खूप बिकट अवस्थेतून  जावं लागते कोणाची जर तबीयत बघडते तेव्हा तो पीडित माणूस दवाखान्यात पर्यंत पोहचत नाही असे अनेक घटना घडून आल्यात अनेक वेळेस रस्ताची  मागणी पण केली आहे तरी देखील सगळे मोठं मोठे नेत्यांनी दुर्लक्ष केले   तरी संबंधितांनी तात्काळ लक्ष रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी  सुनिल अहिरे. दीपक मोहन.   रावसाहेब ईशी. आकाश अहिरे. सखाराम इशी. रविद्र मोहन. मनोज ईशि (सरपंच).  चुनिलाल ईशी इशि . मिलिंद अहिरे .   सुरेश मोहन .छगन  बैसाने .( पोलिस पाटील) रावसाहेब मोहन. बबलु ईशी . बळीराम ईशी . जगन भिल . सुरेश भिल् . शांताराम  कोळी (उप सरपंच) मुकुंद पटेल . विलास ईशी. आदींनी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने