वादळी वा-यामुळे केळीची पाने फाटल्यास व केळीचे कंद/रो रोपे/झाडांची मुळ सहिल झाल्याने होणा-या नुकसानीचा केळी पिक विमाच्या नुकसान भरपाई निकषामध्ये समावेश करण्याची खासदार उन्मेश दादा पाटील यांची मागणी

 



वादळी वा-यामुळे केळीची पाने फाटल्यास व केळीचे कंद/रो रोपे/झाडांची मुळ सहिल झाल्याने होणा-या नुकसानीचा केळी पिक विमाच्या नुकसान भरपाई निकषामध्ये समावेश करण्याची खासदार उन्मेश दादा पाटील यांची मागणी

जळगावदि.२८(प्रतिनिधी) - जिल्हयातील प्रमुख नगदी पिक असलेल्या केळी या पिकास वेळोवेळी होणा-या वादळी वारे/ गारपीट/कमाल किमान तापमान इ. मुळे मोठे नुकसान होत आहे. याकरीता हवामानावर आधारित फळपिक विमा योजनेत केळी या पिकाचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. केळी या पिकात होणा-या विविध पध्दतीच्या नुकसानी बाबत जळगाव जिल्हयातील शेतकरी यांच्या समवेत चर्चा करीत असतांना एक समस्या निर्माण झाली असल्याचे शासनाच्या निदर्शनात आणून देत आहे.केळी या पिकात वादळी वा-याने केळीची पाने फाटल्यास व केळीचे कंद/रोपे/झाडांची मुळ (Roots) सहिल (Loose) झाल्यास मोठ्याप्रमाणावर शेतक-यांचे नुकसान होत आहे. परंतु सदरील बाबींचा केळी पिक विमा योजनेत कुठेही समावेश करण्यात आलेला नाही. हा केळी पीक उत्पादकांवर अन्याय असून यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी या नुकसानीचा समावेश केळी पीक विमा निकषात समावेश करावा अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी राज्याच्या कृषी मंत्र्यांकडे केली आहे. खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की. या बाबत मी केळी संशोधन केंद्र, निमखेडी ता.जि.जळगाव यांच्या कडून माहिती घेतला असता केळीचे घड निसवण्याच्या व फळ वाढीच्या काळात केळीचे पाने जास्तीची  फाटल्यास पाने लवकर सुकतात ज्यामुळे घड पोसण्यास वाढीस आवश्यक तेवढी पाने राहत नाहीत. या मुळे उत्पादनात व गुणवत्तेत घट होऊन शेतक-यांचे नुकसान मोठया प्रमाणात होते. तसेच वादळी वा-याने केळी कंद/रोपे/झाडांची मुळ (Roots) सहिल (Loose) झाल्यास झाडाना मिळणारे अन्नद्रव्यपुरेसे मिळत नाही यामुळे घडावर विपरित परिणाम होऊ शकतो तसेच केळ, खोड एका बाजूला झुकतात व थोडया हवेमुळे झाड कोलमडून पडते. तर  मालाची दुय्यम प्रत मिळत असल्याने बाजार भावापेक्षा कमी भावात शेतक-यांना अपला माल विक्री करावा लागतो.

तरी आपण हवामानावर आधारित फळपिक विमा योजना केळी या पेक्षा निकष ठरवितांना वादळी वा-यामुळे केळीची पाने फाटल्यास व केळीचे कंद/ रोपे/झाडांची मुळ (Roots) सहिल (Loose) झाल्याने होणा-या नुकसानीस देखील विमा संरक्षण मिळवून द्यावे.जेणेकरून शेतक-यांना होणारे नुकसान कुळेतरी कमी करण्यास मदत होईल. आपण तातडीने कार्यवाही कराल अशी अपेक्षा करतो. खासदार उन्मेश दादा पाटील यांनी राज्याच्या कृषी मंत्री मा. ना. श्री.दादाजी भुसे यांचे कडे केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने