*चोपडा तालुका कृषी पदवीधर संघटनेच्या उपाध्यक्ष पदी महेंद्र पाटील तर सचिव पदी सागर पाटील यांची नियुक्ती*
चोपडा दि.२७( प्रतिनिधी) :- येथून जवळच असलेल्या गरताड येथील रहीवासी महेंद्र निंबादास पाटील यांची चोपडा तालुका कृषी पदवीधर संघटनेच्या युवक उपाध्यक्ष पदी तर मोहीदे येथील रहीवासी सागर रामकृष्ण पाटील यांची युवक सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. कृषी पदवीधर संघटनेचे संस्थापक महासचिव कृषीभूषण महेश दादा कडूस पाटील व अध्यक्षा मंगल कडूस पाटील यांनी यांची निवड केली. प्रदेशाध्यक्ष सुरेश खोमाणे ,विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मनिष भदाणे, युवकचे कार्याध्यक्ष राहुल राजपूत, जळगाव जिल्हा युवक कार्याध्यक्ष श्री फकिरचंद पाटील सर यांनी निवडीबद्दल कौतूक केलं आहे. तसेच चोपडा तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.