वर्डी येथील पाच वर्षीय चिमुकलीचा शॉक लागून मृत्यू.. इलेक्ट्रिक पोलला लागला स्पर्श..आदिवासी कुटुंबांवर काळाचा घाला..*




**वर्डी येथील पाच वर्षीय चिमुकलीचा शॉक लागून मृत्यू.. इलेक्ट्रिक पोलला लागला स्पर्श..आदिवासी कुटुंबांवर काळाचा घाला..* 


 *चोपडा दि.३१( प्रतिनिधि) :-*  चोपडा तालुक्यातील वर्डी येथे आज दि. 31 जुलै रोजी सकाळी  गावाच्या उत्तरेस असलेल्या  बैरम नगर भागातील रहिवासी धर्मा नांजी बारेला यांची लहान मुलगी अंगिता धर्मा बारेला ( वय ५ वर्ष ) पाच हि घराजवळ असलेल्या विजेच्या खांबाला स्पर्श होऊन बेशुद्ध अवस्थेत पडली होती. ही घटना तिच्या बाबा नानजी बारेला यांच्या लक्षात सकाळी साडेसहा वाजता बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली. त्यांनी विजेचा शॉक लागल्याने सावध पवित्रा घेऊन लाकडाच्या सहाय्याने दूर केले. लगेच त्यांनी डॉक्टरांना बोलून तपासले असता ,त्यांनी मृत्यू झाल्याचे सांगितले . अंगीताच्या पश्चात आई-वडील दोन भाऊ, दोन बहिणी , आजी, बाबा असा गरीब परिवार आहे, घरात सर्वात लहान असल्याने अंगीता सर्वांची लाडकी लेक होती . आदिवासी बांधव कुटूंबातून अंगीताचा मृत्यूमुळे बैरम नगर परिसरात व गावात हळहळ व्यक्त होत आहे .सदर घटना प्रकाश गंगाराम बारेला यांच्या खबरी वरून आडावद पोलीस स्टेशनचे कर्मचारी फारूक तडवी, कॉन्स्टेबल अरणाडे, पोलीस पाटील पद्माकर नाथ यांनी घटनास्थळी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले पुढील तपास अडावद पोलिस स्टेशनचे 

पीएसआय किरण दांडगे हे करीत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने