*अश्लील किल्प पाठविणाऱ्या व्यापाऱ्यांकडून ..पाच लाखांची तोडिपाणी करु पाहणाऱ्या महिलेने केली सिनेटाईप गुंडागर्दी..सात संशयितांच्या सहकार्याने १८ लाखांची गाडी घेतली हिसकावुन.. संशयीत महिले अटक,७जणांवर खंडणीचा गुन्हा..*


 


*अश्लील किल्प पाठविणाऱ्या व्यापाऱ्यांकडून ..पाच लाखांची तोडिपाणी करु पाहणाऱ्या  महिलेने केली सिनेटाईप गुंडागर्दी..सात संशयितांच्या सहकार्याने १८ लाखांची गाडी घेतली हिसकावुन.. संशयीत महिले अटक,७जणांवर खंडणीचा गुन्हा..*

भुसावळ दि.३१ : अश्लीप क्लीप महिलेला पाठवल्यानंतर त्या

बदल्यात तडजोडीपोटी पाच लाख रुपये न दिल्याने व्यापाऱ्यास मारहाण करीत

 बळजबरीने नोटरीद्वारे 18 लाख रुपये किंमतीची चारचाकी बळकावण्यात आल्याची घटना शहरातील वरणगाव रोडवरील हॉटेल सायलीजवळ गुरुवार, 29 रोजी घडली. या प्रकरणी सात संशयीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याप्रकरणी संशयीत संशयीत

 लीना कृष्णा तल्लारे (51, वरणगाव रोड, साक्री फाटा, भुसावळ) यांना अटक करण्यात आली असून अन्य संशयीत पसार झाले आहेत.

महिलेसह सात जणांविरोधात खंडणीचा गुन्हा व्यापारी निलेश दिगंबर चौधरी (48, श्रीनगर, लोणारी हॉलजवळ, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, गुरुवार, 29 रोजी सकाळी 11 ते 3 दरम्यान ते त्यांच्या मित्रासह बुलेटवरून पिंप्रीसेकम शिवारातील शेतात चक्कर मारण्यासाठी जात असताना वरणगाव रोडवरील हॉटेल सायलीजवळ संशयीत लीना तल्लारे व अन्य दोन अनोळखींनी दुचाकी अडवत पकडण्याचा प्रयत्न केला मात्र फिर्यादी हाताला झटका मारून नवजीवन कॉम्प्लेक्सच्या बुकींग ऑफिसमध्ये गेले व त्याचवेळी तल्लारे यांनी अजय गोडाले यास फोन करताच अजय गोडालेसह शुभम पचेरवाल व अन्य अनोळखी इसम तेथे आला. फिर्यादी यांनी तल्लारे यांना अश्लील क्लीप पाठवल्याने त्यापोटी तडजोड म्हणून पाच लाख रुपयांची मागणी आरोपींनी केली मात्र रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर आरोपी पचेरवालने फिर्यादीस मारहाण करीत जीवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. यावेळी तल्लारे यांनी नोटरी करणाऱ्या वकीलाला बोलावत जबरदस्तीने 18 लाख रुपये किंमतीची टाटा हॅरीयर गाडी (एम.एच. 19 सी. व्ही.6487) ही तल्लारे यांना विक्री केल्याचे कागदपत्रे बनवत गाडी जबरदस्तीने घेवून गेले.

सात संशयीतांविरोधात खंडणीचा गुन्हा तक्रारदार निलेश चौधरी यांना मारहाण करीत त्यांच्याकडील 18 लाखांची चारचाकी बळजबरीने हिसकावल्याप्रकरणी लीना कृष्णा तल्लारे (51, वरणगाव रोड, साक्री फाटा, भुसावळ), अजय गोडाले, शुभम पचेरवाल व अन्य तीन अनोळखींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. लीना तल्लारे यांना अटक करण्यात आली असून अन्य संशयीत पसार झाले आहेत. तपास

सहा निरीक्षक कृष्णा भोये करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने