*जनावरें चोरी करणाऱ्या टोळीचा पडदाफार्श..९ गायी, १ म्हैस केली हस्तगत.. ९ गुन्हे उघड .. दहिवड पोलीसांची धडाडीची कामगिरी..*
दहिवड दि.३१ (संभाजी गोसावी)दहिवडी पोलीस स्टेशन व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे पथकाने चोरीचे एकुण ०९ गुन्हे उघड करुन चोरीस गेलेल्या एकुण ०९ गायी व ०१ म्हैस असा एकुण ३,५६,०००/ जनावरे हस्तगत केली आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी,दहिवडी पोलीस स्टेशन हददीत सन २०२० २०२१ मध्ये जनावरे चोरीस जाण्याचे प्रमाण खुप जास्त झाले होते त्याबाबत दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळे गुन्हे अज्ञात इसमांचे विरोधात दाखल करण्यात आलेले होते. सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याकरीता मा. पोलीस अधिक्षक श्री. अजय कुमार बन्सल सो. मा. अपर पोलीस अधिक्षक श्री धीरज पाटील सो. यांनी मार्गदर्शक सुचना दिलेने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि राजकुमार भुजबळ व पो.ना रविंद्र बनसोडे यांनी तांत्रीक व गोपनीय माहितीच्या आधारे सदर दाखल असले गुन्हयातील जनावर चोरी करणारी टोळी पकडून सदरचे गुन्हे उद्यकीस आणले असून सदर टोळीतील आरोपी नामे १) सागर जालीदर पाटोळे वय २८ वर्षे रा. वेजेगाव ता. खानापूर जि. सांगली २) भगवान ज्ञानदेय चव्हाण वय ६० वर्षे राहतीत ता सांगोला जि. सोलापूर ३) संतोष छगन चव्हाण पय २५ वर्षे रा. आंधळी ता.माण जि. सातारा ४) संजय माणिक अडके, वय ३५ वर्षे रा. आंधळी, ता. माण जि. सातारा ५) राजेंद्र छगन चव्हाण वय ४० वर्षे रा आंधळी ता. माण जि. सातारा व त्याचे इतर साथीदार निष्पन्न करून त्यांचेकडून दहिवडी पोलीस स्टेशनला दाखल असलेले १) गुरन ४५१/२०२० भादवि ३७९ २) गुरन ४७०/ २०२० भादवि ३७९ ३) गुरनं ४५८/२०२० भादवि ३७९४) गुरन ३८/२०२१ भादवि ३७९ ५) गुरनं ४४/२०२१ भादवि ३७९ ६) गुरनं ४९/२०२१ भादवि ३७९ ७) गुरनं १६३/२०२१ भादवि ३७९ ८) गुरन १६६/२०२१ भादवि ३७९ ९) गुरनं २२१/२०२१ भादवि ३७९ हे उघकीस आणले असुन वरील आरोपीतानी सदरचे गुन्हे केल्याचे त्यांनी कबुली दिली आहे. तसेच त्यांचेकडुन ०९ गुन्हयांमध्ये चोरीस गेलेले एकूण ०९ गायी व १ न्हँस असा एकूण ३.५६,००० लाख रुपये किंमतीची जनावरे हस्तगत करण्यात आली असून सदरच्या कारवाईत आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरचे गुन्हे मा. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख सो यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, पोउनि प्रमोद दीक्षित, पोउनि देवानंद तुपे, स.फो प्रकाश हांगे, स.फॉ अशोक हजारे, पो. हवा संजय केंगले, पो. ना रविंद्र बनसोडे, पो.कॉ प्रमोद कदम व होमगार्ड तानाजी मुळीक व उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी यांचे तपास पथकातील पोलीस नाईक नितीन सजगणे यांनी उघडकीस आणले आहेत.
सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधिक्षक श्री. अजय कुमार बन्सल सो. मा. अपर पोलीस अधिक्षक श्री धीरज पाटील सो. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख सौ. व सपोनि श्री राजकुमार भुजबळ यांचे मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस स्टेशनचे संजय नाना केंगले पोलीस हवालदार हे करीत आहेत.