*
👉 *जळगाव दि.30 (महेश शिरसाठ) :* जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भिवंडी निजामपूर महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज आसिया याची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. बी. एन. पाटील यांचु बदली झाल्याने ही नियुक्ती झाली आहे. डॉ. पाटील यांनीही कोरोना काळात मोलाची कामगिरी बजावली आहे.
डॉ. पंकज आसिया हे धडाकेबाज व भ्रष्टाचाराचे कर्दनकाळ म्हणून प्रख्यात व कर्तव्यदक्ष अधिकारी प्रख्यात आहेत. भिवंडीत कोरोना परिस्थिती चिघळल्यानंतर ती आटोक्यात आणण्यासाठी त्यांची खास नियुक्ती करण्यात आली होती.
डॉ. पंकज आसिया हे मुळ राजस्थान राज्यातील जोधपूर येथील शक्तीनगर भागातील निवासी आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षक हे शहरातील आदर्श विद्यामंदिर लाल सागर येथे झाले आहे. तर सन2012 मध्ये निम्स मेडिकल कॉलेज मध्ये एमबीबीएस ची डिग्री प्राप्त केली आहे. त्यानंतर सन 2013 पासून आय एस आय साठी प्रयत्नाची पराकाष्ठा करत तिसऱ्या प्रयत्नात ते सन 2016 मध्ये 29 रॅंकला प्राविण्य मिळवत नाशिक उपजिल्हाधिकारी तथा कळवण प्रकल्प अधिकारी म्हणून मोलाची कामगिरी बजावली. त्यानंतर त्यांची भिवंडी निजामपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून भरदार कामगिरी करत टाॅप अधिकारींच्या यादीत स्थान मिळविले. त्यांचे वडील लादूदान चारण मंडोरे हे सॅटेलाईट हाॅस्पिटलचे वरिष्ठ चिकित्सा अधिकारी आहेत. डॉ पंकज आसिया हे कोरोना परिस्थिती हाताळण्यात चाणक्य असल्याचे समजते. त्यांच्या नियुक्तीने जळगाव जिल्ह्य़ात जनमाणसांत आनंदाचे वातावरण आहे.