जळगाव महापालिकेवरील 110 कोटींचे कर्ज* *माफ होण्यासाठी अजितदादांकडे पाठपुरावा करू*.. ‘ *राष्ट्रवादी’चे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसेंचे महापौर, विरोधी पक्षनेत्यांना आश्वासन**

 


 


*जळगाव, ता. 1*(प्रतिनिधी) जळगाव शहरातील विकासकामांसंदर्भात आज बुधवार, दि. 30 जून 2021 रोजी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन व महापालिकेतील विरोधी पक्षनेते श्री.सुनिल महाजन यांनी माझी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या चर्चेवेळी त्यांनी दिलेल्या कागदपत्रांच्या आधारे असे दिसून आले, की जळगाव महापालिकेच्या मागील कालखंडात तत्कालीन पालकमंत्री श्री.गिरीश महाजन यांनी जळगाव शहर आता कर्जमुक्त झाले, अशी घोषणा केली होती. मात्र, ‘म्हाडा’ व ‘हुडको’ यांचे 250 कोटी रुपये कर्ज जैसे थे होते. हे कर्ज वाढीस लागून जवळपास ते 389 कोटींपर्यंत पोहोचले. यातील 250 कोटी रुपये शासनाने भरले. त्यापैकी 125 कोटी रुपये परत मागून घेतले. त्यामुळे हे 125 कोटी रुपये शासनाला देण्याकरिता महापालिकेस दरमहा 3 कोटी रुपये द्यावे लागत आहेत. हा सर्व प्रकार म्हणजे जळगावकरांची दिशाभूल करणारा आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत महापालिकेकडे शासनाचे थकीत असलेले 110 कोटी रुपये शासनाकडून माफ केले जावेत, अशी त्यांनी माझ्याकडे मागणी केली आहे. हे कर्ज जर माफ झाले, तर दरमहा वाचणार्‍या 3 कोटी रुपयांत आम्हाला जळगाव शहरात विकासकामे करणे सोपे होईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून रखडलेला आहे. त्यातही लक्ष घालण्यासंदर्भात त्यांनी सांगितले. त्यावर मी जळगाव महापालिकेवर असलेले 110 कोटी रुपये कर्ज माफ व्हावे, यासाठीच राज्याचे अर्थमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार यांची लवकरच भेट घेऊन संपूर्ण पाठपुरावा करून हा विषय डिसेंबरअखेर मार्गी लावेल, असे आश्वासन आपल्या माध्यमातून मी त्यांना देत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री श्री.एकनाथराव खडसे म्हणाले.


जळगावच्या महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन व महापालिकेतील विरोधी पक्षनेते श्री.सुनिल महाजन यांनी आज त्यांच्या जळगावातील ‘मुक्ताई’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली तसेच बंदद्वार चर्चा केल्यानंतर झालेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. श्री.खडसे म्हणाले, की जळगाव शहरातील विकासकामांसंदर्भात आज महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन व महापालिकेतील विरोधी पक्षनेते श्री.सुनिल महाजन यांनी माझी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या चर्चेवेळी त्यांनी दिलेल्या कागदपत्रांच्या आधारे असे दिसून आले, की जळगाव महापालिकेच्या मागील कालखंडात तत्कालीन पालकमंत्री श्री.गिरीश महाजन यांनी जळगाव शहर आता कर्जमुक्त झाले, अशी घोषणा केली होती. ती पूर्णपणे जळगावकरांची दिशाभूल करणारी ठरली आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत महापालिकेकडे शासनाचे थकीत असलेले 110 कोटी रुपये शासनाकडून माफ केले जावेत, अशी त्यांनी माझ्याकडे मागणी केली. तसेच शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न ठेकेदाराच्या हेकेखोरपणामुळे गेल्या काही दिवसांपासून रखडलेला आहे. या पुलाच्या कामासाठी ‘महावितरण’ची समस्या आड आली. यासाठी महापालिकेला 60 लाख रुपये लागणार होते, ते आता दीड कोटी भरावे लागतील. यासंदर्भात परवाच महापौरांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षकांसह ‘महावितरण’च्या अधिकार्‍यांसमवेत चर्चा केली. त्यामुळे आता कामास वेग येणार आहे. मात्र, त्यातही मला लक्ष घालण्यासंदर्भात सांगितले. त्यावर मी जळगाव महापालिकेवर असलेले 110 कोटी रुपये कर्ज माफ व्हावे, यासाठी राज्याचे अर्थमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार यांची भेट घेऊन हा विषय डिसेंबरअखेर मार्गी लावेल, असे त्यांना सांगितले.


यावेळी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन, महापालिकेतील विरोधी पक्षनेते श्री.सुनिल महाजन, नगरसेवक श्री.सुनिल खडके, माजी आमदार डॉ.गुरुमुख जगवानी, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगरप्रमुख श्री.अभिषेक पाटील, श्री.अशोक लाडवंजारी, श्री.सुनिल माळी, अ‍ॅड. कुणाल पवार, स्वप्नील नेमाडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



*कोणताही राजकीय भूकंप नाही : श्री.सुनिल महाजन*

दरम्यान, श्री.एकनाथराव खडसे यांच्या पत्रकार परिषदेनंतर महापालिकेतील विरोधी पक्षनेते श्री.सुनिल महाजन यांना पत्रकारांनी बंदद्वार चर्चेसंदर्भात छेडले असता श्री.महाजन म्हणाले, की नाथाभाऊंची मी नियमित भेट घेत असतो. महापौरांसमवेत घेतलेली आजची भेट ही जळगावच्या विकासकामांसंदर्भात होती. मी मा.श्री.सुरेशदादा जैन यांचा कार्यकर्ता असून, सच्चा शिवसैनिक आहे. शिवसेनेत गटबाजी नाही, कोणताही राजकीय भूकंप सध्यातरी नाही. भाजपचे आणखी आठ-दहा नगरसेवक फुटीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांची पालकमंत्री मा.ना.श्री.गुलाबराव पाटील व माझ्यासह नाथाभाऊंशीही चर्चा झाली आहे. यासंदर्भात जे काही होईल, ते तुम्हाला नक्की कळेल.     


*..............*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने