दिलीप वैद्य सर यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार जाहीर...

 


 रावेर दि. 30 (प्रतिनिधी) 

रावेर तालुक्यातील 

नामे दिलीप रत्नाकर वैद्य.     

 व्यवसाय- माध्यमिक शिक्षक. 

 शाळा- श्री बाजीराव नाना पाटील माध्यमिक विद्यालय, बलवाडी.ता.रावेर जि जळगाव. 

 एकूण सेवा - ३० वर्ष. विषय- मराठी,हिंदी,इतिहास. शिक्षण- एम कॉम. बी एड. विश्वस्त- रंगपंचमी व्याख्यानमाला, रावेर.

कार्याध्यक्ष- महाराष्ट्र राज्य सार्वजनिक व्याख्यानमाला समन्वय समिती,पुणे.

 संस्थापक- सांस्कृतिक कला मंच, रावेर.

 अध्यक्ष- कुसुमताई सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय रावेर. 

माजी सचिव व माजी संचालक- राजे रघुनाथराव देशमुख तालुका मुक्तद्वार वाचनालय,रावेर.

 तज्ज्ञ मार्गदर्शक- इयत्ता नववी आणि दहावीच्या नवीन अभ्यासक्रमाबाबत विभाग,जिल्हा आणि तालुका स्तरावर मार्गदर्शक म्हणून कार्य.

 शालेय विद्यार्थ्यांसाठी "गोष्टीरुप लोकसेवक मधुकरराव चौधरी" पुस्तकाचे लेखन.

  तालुका बातमीदार- दै सकाळ.

 गेल्या तीस वर्षापासून 

(१९९१ पासून) सकाळ वृत्तपत्रात सातत्याने विविध विषयांवर लेखन.

  मे २०१८ मध्ये इस्राईल मध्ये झालेल्या एग्रीटेक २०१८ या जागतिक कृषी प्रदर्शनाचे सकाळ आणि ऍग्रोवन या वृत्तपत्रांसाठी वृत्तांकन करण्यासाठी इस्राईल दौरा.

२०१०- दिल्ली येथे झालेल्या जागतिक केळी परिषदेचे दिल्लीतून दैनिक सकाळ आणि ॲग्रोवन साठी वृत्तांकन.

गेल्या ३० वर्षांपासून केळी या विषयावर वैविध्यपूर्ण लेखन, केळी उत्पादकांचे प्रश्न, समस्या, त्यावर उपाय, यशोगाथा, निर्यात, वाहतूक इत्यादी प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा.

 लोकसभा आणि विधानसभा निवडणूक- २०१९ च्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून विविध प्रसार माध्यमांमध्ये सकारात्मक बातम्या व लेखनाबद्दल माननीय जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सत्कार.

 कृषीविषयक सकारात्मक लेखनाबद्दल जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने जिल्हास्तरीय पुरस्कार.

आकाशवाणी जळगाव केंद्रावर १०० पेक्षा जास्त कार्यक्रमांचे लेखन व सहभाग. या सर्व बाबींचा विचार करून वैद्य सर यांचें कार्य समाजात जागृती, इतरांना प्रेरणादायक, विधयाक कार्य ,आपली संस्कृती जोपासण्यासाठी सतत कार्यरत, परिश्रम घेणारे,खडतर, सडेतोड व्यक्तित्वाचे प्रतिबिंब आहे. आपल्या लेखणीची धार ही तलवारी चा घाव आहे,याचा अंदाज , परिणाम ते चांगला ओळखून आहेत, म्हणून ते कोणतीही बातमी लिहीताना चौहोबाजूंचा विचार करून,शांत सयंमी, दुरदुष्टी,सुसंस्कृत, सत्य पडताळणी करूनच करतात.कधीही बातमी लिहीताना घाई करीत नाहीत. म्हणून अशा शांत, सयंमी, सडेतोड व्यक्तिमत्त्वाचा सन्मान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई संघटनेच्या रावेर तालुका अध्यक्ष विलास ताठे, उपाध्यक्ष संतोष नवले, कार्याध्यक्ष योगेश सैतवाल, प्रदीप महाराज, सद्दाम पिंजारी यांच्यासह सर्व पत्रकार संघाचे सदस्य पदाधिकारी मंडळी यांच्या सहमतीने जीवन गौरव पुरस्कार जाहीर केला आहे, तरी तो पुरस्कार येत्या 8 ऑगस्ट रोजी त्यांना उत्तर महाराष्ट्र राज्याचे विभागीय अध्यक्ष श्री प्रविण सपकाळे सह आदी मान्यवर मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरण सोहळ्यात देण्यात येईल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने