महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई रावेर तालुका संघटनेच्या वतीने पुरस्कार सोहळा जाहीर...

 


 रावेर, दि. 30(प्रतिनिधी) 

 महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई संघटनेच्या रावेर तालुका वतीने दि, 8 ऑगस्ट 2021 रोजी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, 

उत्तर महाराष्ट्र राज्याचे विभागीय अध्यक्ष प्रविण सपकाळे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गायके यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विलास ताठे, उपाध्यक्ष संतोष नवले, कार्याध्यक्ष योगेश सैतवाल यांच्यासह सर्व पत्रकार संघ सदस्य पदाधिकारी मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत खिरडी येथील मासिक मिटीग मध्ये दि 8 ऑगस्ट रोजी रावेर - यावल तालुक्यातील जेष्ठ पत्रकार व्यक्तीं यांना जीवनगौरव,मुकनायक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.यात रावेर तालुक्यातील जेष्ठ पत्रकार देवलाल पाटील, दै तरुण भरत रावेर तालुका प्रतिनिधी यांना मुकनायक, लेखी सम्राट दिलीप वैद्य सर दैनिक सकाळ वृत्तसेवा रावेर तालुका प्रतिनिधी यांना जीवनगौरव पुरस्कार तर यावल तालुक्यातील जेष्ठ पत्रकार डि बी पाटील,दै लोकमत यावल प्रतिनिधी यांना मुकनायक, निर्भिड पत्रकार सुरेश पाटील यांना जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई रावेर तालुका संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहेत.

त्याचप्रमाणे सामाजिक, व्यावसायीक, आरोग्य, शेती, सेवाकार्य, जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, युवा कार्यकर्ते, सह विशेष प्राविण्य, गौरव प्राप्त आदी मान्यवर मंडळी, समस्त रावेर तालुका पत्रकार बांधव यांना हि गौरविण्यात येणार आहे.


सदर बैठकीत पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली असून या कार्यक्रमाची रुपरेषा ठरवण्यात आली. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रावेर तालुकाध्यक्ष विलास ताठे यांनी सर्वप्रथम कोरोना रोगांच्या दुसऱ्या लाटेच्या काळात दुर्दैवाने मरण पावलेल्या सर्व देशांतील मयत पत्रकार बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी प्रदीप महाराज दैनिक सामना खिरडी प्रतिनिधी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आल्या, यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रावेर तालुका अध्यक्ष विलास ताठे, उपाध्यक्ष संतोष नवले, कार्याध्यक्ष योगेश सैतवाल, सद्दाम पिंजारी, तालुका सल्लागार, ईश्वर महाजन,

दिलीप नथ्थु भारंबे, विनोद कोळी, गिरीश नारखेडे, संभाजी पाटील, ज्ञानेश्वर महाजन, योगेश पाटील, प्रमोद कोंडे, संतोष पाटील, रविंद्र महाजन, प्रभाकर महाजन, भीमराव कोचूरे, विनायक जहुरे, संतोष बारी, संजय बारी, जगदिश चौधरी, अनिल मानकरे, संकेत महाजन, विनोद पाल्ले, मिलिंद कोरे, दिलीप सोनवणे, आनंद भालेराव, शे शरीफ, शे अजीज, विजय कोळी, आकाश भालेराव, प्रशांत पाटील, हिराजी पाटील, जयंत पाटील, संजय पाटील, सुमित पाटील, शे दस्तगीर, 

सावदा प्रतिनिधी कैलास लंवगडे, दिपक श्रवगे, कविता सळकाळके, प्रदीप कुलकर्णी, 

लक्ष्मण ठाकूर सर सह रावेर तालुका पत्रकार संघाचे अनेक पदाधिकारी व सदस्य मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने