ट्रँक्टर घेण्यासाठी विवाहितेकडुन पैशांची मागणी.. विहिरीत उडी घेऊन सपनाची आत्महत्या सासरच्या चौघांवर गुन्हा

 



 *कोपरगाव दि.30 (हफिज शेख* ) संगमनेर तालुक्यातील हिरेवाडी येथे २४ वर्षीय विवाहित महिलेने आत्महत्या केली आहे.सपना सोमनाथ गेठे असे विहिरीत उडी मारून आत्महत्या करणाय्रा विवाहितेचे नाव आहे.सपना ईचा सासरच्यांकडुन छळ करण्यात आला असल्याचे नातेवाईकांनी सांगत घारगाव पोलिस स्टेशनला तक्रार करत पोलिसांनी सारच्यांवर चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.


 टँक्टर घेन्यासाठी माहेरून दोन लाख रूपये घेऊन ये असा तगादा संगमनेरच्या समनापुर येथील सासरच्यांनी सपनाला लावला होता.तसेच शिवगाळी व मारहान देखील २४ वर्षीय सपना गेठेला होत होती.आखेर आपल्या माहेरी येऊन सपना ईने झालेली हकीगत सांगत तालुक्याच्या पठारभागातील हिरेवाडी येथे आज सकाळी बेपत्ता होत विहीरीत उडी मारून आत्महत्या केली आहे.माहेरच्यांनी सपनाचा मृतदेह थेट घारगाव पोलिस स्टेशनला नेत आरोपींना ताक्ताळ अटकेची मागणी केली यात ४ आरोपींवर गुन्हा दाखल करत काही आरोपिंना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहीती घारगाव पोलिसांनी दिली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने