मंगरुळ येथे राजमाता आहिल्यादेवी होळकर प्रवेशद्वार उभारण्याची मागणी

 


वर्डी ता चोपडा(वार्ताहर) येथुन जवळच असलेले मंगरुळ ता चोपडा येथे      

दि.२८ जुन सोमवार रोजी सकाळी ९:०० वाजता ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा सौ.वैशाली पाटील तलाठी यांना ग्रा. प्र.सदस्या सौ. अश्विनी विलास धनगर यांच्या हस्ते देण्यात आली व मंगरुळ येथे पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचे प्रवेशद्वार उभारण्याची मागणीचे निवेदन ग्रामसेवक प्रवीण. बी. शिंदे व सरपंच सौ .उज्वलाताई अतुल ठाकरे यांना धनगर समाज संघटक या नात्याने

विलास पांडुरंग धनगर व सर्व धनगर समाज बांधवाच्या उपस्थितीत देण्यात आले.यावेळी सरपंच उज्वला ठाकरे व त्यांचे पती चो स का चेअरमन अतुल ठाकरे यांनी २१ हजार रुपयाची देणगी देवुन आहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचे प्रवेशद्वार उभारण्याची ग्वाही दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल धनगर यांनी केले. यावेळी उपसरंच निर्जलाबाई पाटील,ग्रा पं सदस्य कांतीलाल पाटील, राकेश पाटील,शिवाजी साळुंके, विलास बळीराम धनगर, माजी उपसरपंच सुरेश न्हायदे, कल्याण धनगर , रघुनाथ धनगर, भिका धनगर, देवीदास धनगर,निंबा धनगर, अमोल धनगर, रविंद्र धनगर, राजेंद्र धनगर हिम्मत धनगर , प्रविण धनगर, सुकलाल धनगर सह समाज बांधव उपस्थीत होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने