अडावद ( प्रतिनिधी) :---
दि २७ जून वार रविवार रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटसह पावसाने हजेरी लावली .
चोपडा तालुक्यातील गरताड यागावी दारासिंग दलसिंग बारेला हा दुसऱ्या शेतकऱ्यांची शेती उकत्याने करून आपले उदरनिर्वाह करीत होता .
दि २७ जून रोजी दारासिंग दलसिंग बारेला आपल्या शेतात काम करीत असताना अचानक पावसाने हजेरी लावली त्यामुळे त्याने आपली बैलजोडीस झाडाखाली बांधून तो दुसऱ्या ठिकाणी जाऊन आडोश्याला उभा राहिला त्यावेळी अचानक विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट होऊन बैलांच्या अंगावर वीज कोसळल्याने दोघेही बैलांच्या जागीच मृत्यू झाला आहे , बैलांनी अक्षरशः जीभ बाहेर काढून आपले प्राण सोडले आहेत . सदर बैलजोडीची किंमत एक लाख रुपयांचे वर सांगण्यात येत आहे . शेतकरी आधीच विविध प्रकारच्या संकटात होरपळून निघत असून त्यात पुन्हा अचानक आलेल्या संकटांना त्याला तोंड द्यावे लागत आहे .
सदर घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .
सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसात वीज कोसळून दोन जनावरे दगावली आहेत.
याबाबत महसूल विभागाकडून तात्काळ पंचनामा करण्यात आला आहे ..रविवारी चारच्या सुमारास अचानक पणे चोपडा तालुक्यात ढगाळ वातावरण तयार झाले. वादळी वारे वाहू लागले. त्यातच पावसाला सुरुवात झाली.